मायकेल क्लार्कचे सलग दुसरे द्विशतक आणि डेव्हिड वॉर्नर तसेच मायकेल हसी यांच्या घणाघाती शतकामुळे ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात दमदार सुरुवात केली आहे. ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांचा पुरेपूर समाचार घेत पहिल्याच दिवशी पाच विकेट्सच्या मोबदल्यात ४८२ धावांचा डोंगर उभारला आहे. कसोटीत एका दिवशी ४००पेक्षा अधिक धावण्याची करामत ऑस्ट्रेलियाने पाच वेळा साधली. एका वर्षांत चार द्विशतके झळकावणारा क्लार्क हा कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील पहिला फलंदाज ठरला आहे. क्लार्क आणि हसी यांनी पाचव्या विकेटसाठी २७२ धावांची भागीदारी रचली. त्यानंतर डेल स्टेनने हसीचा (१०३) त्रिफळा उद्ध्वस्त केला. क्लार्क ३९ चौकार आणि एक षटकारासह २२४ धावांवर खेळत आहे.
संग्रहित लेख, दिनांक 23rd Nov 2012 रोजी प्रकाशित
क्लार्कचे शतक; ऑस्ट्रेलियाचा धावांचा डोंगर
मायकेल क्लार्कचे सलग दुसरे द्विशतक आणि डेव्हिड वॉर्नर तसेच मायकेल हसी यांच्या घणाघाती शतकामुळे ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात दमदार सुरुवात केली आहे.
First published on: 23-11-2012 at 04:19 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Austrelia have lots of runs with clarke had made his century