‘दीपक हुड्डा या हंगमात बडोदा संघाचं प्रतिनिधीत्व करणार नाही, असा निर्णय मुख्य परिषदेनं घेतल्याची माहिती BCA प्रचार समितीचे अध्यक्ष सत्यजित गायकवाड यांनी प्रसारमाध्यमांनी दिली. तर BCA चे संयुक्त सचिव पराग म्हणाले की, ‘दीपक हुड्डानं स्पर्धेतून माघार घेण्यापूर्वी बीसीएशी चर्चा करायला हवी होती. त्यानं अचानक निर्णय घेऊन चूक केली. मात्र त्यासाठी संपूर्ण हंगाम त्याच्यावर बंदी घालणं चुकीचं आहे. दीपक हुड्डाला समज देऊन आगामी स्पर्धा खेळण्याची परवानगी द्यायला हवी होती. ‘
आणखी वाचा- IPL 2021 : राजस्थानचा ‘हा’ धडाकेबाज फलंदाज आता चेन्नईच्या संघात
काय होतं प्रकरण?
पांड्याने शिवीगाळ केल्याची आणि करीअर संपवण्याची धमकी दिली अशी तक्रार करत हुड्डाने अखेरच्या क्षणी मुश्ताक अली करंडक ट्वेन्टी-२० स्पर्धेतून माघार घेतली होती. सराव करत असताना पांड्या आणि हुड्डामध्ये वाद झाला. त्यानंतर पांड्याने शिवीगाळ केली आणि कारकिर्द संपवण्याची धमकी दिली. त्यामुळे मुश्ताक अली स्पर्धेतून माघार घेत आहे, अशी तक्रार दीपक हुड्डाने बीसीसीआयकडे ईमेलद्वारे केली होती.