Australia Women vs South Africa Women T20 WC Final Match: ऑस्ट्रेलियाची सलामीवीर बेथ मुनीने रविवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध महिला टी-२० विश्वचषक २०२३ च्या अंतिम सामन्यात अर्धशतक झळकावून इतिहास रचला. ऑस्ट्रेलियन संघासाठी नाणेफेक जिंकून डावाची सुरुवात करणाऱ्या मुनीने ४४ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. त्याचबरोबर महिला टी२० विश्वचषकाच्या इतिहासातील अंतिम सामन्यात दोन अर्धशतके झळकावणारी ती जगातील पहिली खेळाडू ठरली.

बेथ मुनीने ५३ चेंडूत ७४ धावांची खेळी केली. तिने आपल्या खेळीच ९ चौकार आणि एक गगनचुंबी षटकार लगावला. त्याचबरोबर संघाला २० षटकांत ६ बाद १५६ धावांपर्यंत नेण्यात मोलाची भूमिका बजावली. २०२० मध्ये झालेल्या महिला टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात बेथ मुनीने भारताविरुद्ध ७८ धावांची नाबाद खेळी केली होती. यावेळी ती ७४ धावा करून नाबाद राहिली. मुनीने १३९.६२च्या स्ट्राइक रेटने फलंदाजी केली आणि संघाला सुरक्षित धावसंख्या गाठून दिली.

Marcus Stoinis Highest individual scores in IPL run chases with 124 Runs
IPL 2024: मार्कस स्टॉइनसची ऐतिहासिक खेळी, आयपीएलच्या इतिहासात ही कामगिरी करणारा पहिला फलंदाज
Rohit Sharma Unwanted Record In IPL 2024
MI vs CSK : रोहित शर्माच्या नावावर झाली नकोशा विक्रमाची नोंद, ‘या’ बाबतीत ठरला तिसरा खेळाडू
IPL 2024 Mumbai Indians vs Royal Challengers Bangalore Match Updates in Marathi
IPL 2024: जसप्रीत बुमराहने ५ विकेट्स घेत रचला इतिहास, आयपीएलच्या १७ वर्षांत ही कामगिरी करणारा ठरला पहिला गोलंदाज
Rr Vs Gt Ipl 2024 Sanju Samson 50th Match As Captain
RR vs GT : संजू सॅमसनने ५०व्या सामन्यात केला खास पराक्रम, ‘या’ बाबतीत रोहित शर्मासह तीन कर्णधारांना टाकले मागे

विश्वचषकातील तिसरी सर्वोच्च धावसंख्या –

महिला टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात सर्वात मोठी खेळी खेळण्याचा विक्रम बेथ मुनीच्या नावावर आहे. रविवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नाबाद ७४ धावांची खेळी करून ती स्वत:च्याच विक्रमाची बरोबरी करण्यास मुकली. २०२० मध्ये तिने भारताविरुद्ध नाबाद ७८ (५४) खेळून विश्वविक्रम आपल्या नावावर केला. याच सामन्यात ३९ चेंडूत ७५ धावा करणारी एलिसा हिली या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. रविवारी आपल्या अर्धशतकासह, मुनीने विश्वचषक फायनलमधील सर्वात मोठ्या खेळीच्या यादीत पहिले आणि तिसरे स्थान गाठले आहे.

हेही वाचा – AUSW vs SAW Final: बेथ मुनीच्या नाबाद ७४ धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाचे दक्षिण आफ्रिकेला १५७ धावांचे लक्ष्य

सलग दुसऱ्यांदा विश्वचषकात बॅटने धमाका केला –

सलग दुसऱ्यांदा महिला टी-२० विश्वचषकात बेथ मुनीची कामगिरी प्रभावी ठरली आहे. मुनीने ५१.५० च्या प्रभावी सरासरीने आणि ११७.७१ च्या स्ट्राइक रेटने २०६ धावा केल्या आहेत, टूर्नामेंटच्या ६ सामन्यांच्या ६ डावांमध्ये दोनदा नाबाद राहिली आहे. ती स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत इंग्लंडच्या नताली स्कायव्हर (२१६) नंतर दुसऱ्या स्थानावर होती. २०२० मध्ये, मूनीने विश्वचषक स्पर्धेत ६ सामन्यांमध्ये ६४.७५च्या सरासरीने आणि १२५.१२च्या स्ट्राइक रेटने २५९ धावा केल्या. दोन्ही वेळा तिच्या बॅटमधून ३-३ अर्धशतके झळकली आहेत.