मैदानावर खंडीभर नोटा मोजण्यात सतत गर्क राहिल्यामुळे भारताचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने वाणिज्य शाखेच्या पहिल्या वर्षांच्या परीक्षेस दांडी मारली. येथील एका महाविद्यालयात त्याने पाच वर्षांपूर्वी वाणिज्य शाखेत प्रवेश घेतला होता. सेंट झेवियर महाविद्यालयात त्याने प्रवेश घेतला असला तरी अद्याप सहा सत्र परीक्षांपैकी एकही परीक्षा तो देऊ शकला नाही. सततच्या क्रिकेट सामन्यांमुळे तो महाविद्यालयातही आलेला नाही, असे महाविद्यालयाचे प्राचार्य निकोलस टेटे यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, धोनीने वाणिज्य शाखेच्या तीन वर्षे पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला आहे. मात्र हा अभ्यासक्रम तीनऐवजी पाच वर्षांचा करण्यात आला आहे. त्यामुळे त्याला पाच वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करावा लागेल.