भारत आणि पाकिस्तान सामन्यादरम्यान दोन व्यक्ती कायम प्रेक्षकांमध्ये दिसतात. भारत आणि पाकिस्तानचे झेंडे हातात घेतलेले चाचा शिकागो आणि सचिन तेंडुलकरचा मोठा चाहता असलेला सुधीर गौतम भारत-पाकिस्तान सामन्याला कायम हजर असतात. मात्र यंदा चाचा शिकागो भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान दिसणार नाहीत. पाकिस्तानी संघाच्या कामगिरीवर नाराज असलेल्या चाचांनी यंदा भारत आणि पाकिस्तानची तुलनाच होऊ शकणार नाही, असे म्हटले आहे. भारतीय संघ पाकिस्तानच्या खूप पुढे आहे, असे चाचा शिकागो यांनी म्हटले आहे.

भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यांदरम्यान कायम उपस्थित असणारे मोहम्मद बशीर चाचा शिकागो नावाने ओळखले जातात. चाचा शिकागो सहा महिन्यांमध्ये पहिल्यांदाच भारत-पाकिस्तान सामन्याला मुकणार आहेत. ‘क्रिकेटचा विचार केल्यास भारत खूप पुढे निघून गेला आहे. या दोन्ही संघांची आता तुलनादेखील होऊ शकत नाही,’ असे चाचा शिकागो यांनी म्हटले आहे. ‘एका बाजूला धोनी, कोहली, युवराज आहेत आणि पाकिस्तानी संघात एकही मोठा खेळाडू नाही,’ असे म्हणत चाचा शिकागो यांनी नाराजी व्यक्त केली. ‘यंदा भारतीय संघ आरामात पाकिस्तानचा पराभव करेल,’ असे चाचा शिकागो यांनी म्हटले.

A 19-year-old girl, Ayesha Rashid
…फिर भी दिल है हिंदुस्तानी! पाकिस्तानमधील १९ वर्षीय आयेशावर भारतात यशस्वी हृदयरोपण शस्त्रक्रिया!
Operation Meghdoot, Siachen,
विश्लेषण : पाकिस्तानला चकवा देत सियाचिनवर कब्जा… थरारक ‘ऑपरेशन मेघदूत’ मोहीम कशी फत्ते झाली?
west bengal chief minister bidhan chandra roy include berubari in indian territory from east pakistan
कचाथीवू गमावले, पण बेरूबारी कमावले… नेहरूंचा विरोध डावलून बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी कसा मिळवला पूर्व पाकिस्तानकडून भारतीय भूभाग?
babar azam became again captain of pakistan cricket team
बाबर पुन्हा पाकिस्तानचा कर्णधार

‘कधीकाळी पाकिस्तानी संघात जावेद मियाँदाद, वसिम अक्रम, वकार युनूससारखे दिग्गज खेळाडू होते. मात्र आता पाकिस्तानी संघातील खेळाडूंची नावेदेखील मला माहिती नाहीत. त्यामुळे यंदा भारतासमोर मोठे आव्हान नसेल,’ असे चाचा शिकागो यांनी म्हटले. मोहम्मद बशीर यांनी २०११ विश्वचषक सामन्याच्या उपांत्य फेरीपासून भारत-पाकिस्तानचा एकही सामना चुकवलेला नाही. मात्र येत्या रविवारी असणाऱ्या सामन्याला चाचा शिकागो उपस्थित असणार नाहीत.

‘मी २०११ नंतर भारत-पाकिस्तान सामना चुकवलेला नाही. मला इंग्लंडला जाऊन भारत-पाकिस्तान सामना पाहायला आवडले असते. मात्र महिन्याभरापूर्वीच मी कुटुंबासह मक्क्याला जाणे निश्चित केले होते. कालच मला सुधीरने भारत-पाकिस्तानला सामन्याला येणार का, हे विचारण्यासाठी फोन केला होता. यंदा भारत पाकिस्तानला अगदी सहज पराभूत करेल आणि यंदाची स्पर्धादेखील जिंकेल, असे मला वाटते,’ असे चाचा शिकागो यांनी म्हटले.