भारत आणि पाकिस्तान सामन्यादरम्यान दोन व्यक्ती कायम प्रेक्षकांमध्ये दिसतात. भारत आणि पाकिस्तानचे झेंडे हातात घेतलेले चाचा शिकागो आणि सचिन तेंडुलकरचा मोठा चाहता असलेला सुधीर गौतम भारत-पाकिस्तान सामन्याला कायम हजर असतात. मात्र यंदा चाचा शिकागो भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान दिसणार नाहीत. पाकिस्तानी संघाच्या कामगिरीवर नाराज असलेल्या चाचांनी यंदा भारत आणि पाकिस्तानची तुलनाच होऊ शकणार नाही, असे म्हटले आहे. भारतीय संघ पाकिस्तानच्या खूप पुढे आहे, असे चाचा शिकागो यांनी म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यांदरम्यान कायम उपस्थित असणारे मोहम्मद बशीर चाचा शिकागो नावाने ओळखले जातात. चाचा शिकागो सहा महिन्यांमध्ये पहिल्यांदाच भारत-पाकिस्तान सामन्याला मुकणार आहेत. ‘क्रिकेटचा विचार केल्यास भारत खूप पुढे निघून गेला आहे. या दोन्ही संघांची आता तुलनादेखील होऊ शकत नाही,’ असे चाचा शिकागो यांनी म्हटले आहे. ‘एका बाजूला धोनी, कोहली, युवराज आहेत आणि पाकिस्तानी संघात एकही मोठा खेळाडू नाही,’ असे म्हणत चाचा शिकागो यांनी नाराजी व्यक्त केली. ‘यंदा भारतीय संघ आरामात पाकिस्तानचा पराभव करेल,’ असे चाचा शिकागो यांनी म्हटले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chacha chicago mohammad bashir says india should comfortably beat pakistan will win icc champions trophy
First published on: 30-05-2017 at 09:24 IST