किरान गिब्ज आणि ल्युकास पोडोलस्की यांनी अखेरच्या तीन मिनिटांमध्ये साकारलेल्या दोन गोलच्या बळावर अर्सेनलने चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत अँडरलेचवर २-१ असा नाटय़मय विजय मिळवला. सामन्यामध्ये ८८ मिनिटांपर्यंत अर्सेनलला एकही गोल झळकावता आला नव्हता.
सामन्याच्या पहिल्या सत्रामध्ये जोरदार आक्रमणे दोन्ही संघांकडून झाली, परंतु एकही गोल झाला नव्हता. मध्यंतराला ०-० अशा बरोबरीत खेळ थांबल्यावर दुसऱ्या सत्रामध्ये पुन्हा एकदा जोरदार आक्रमणे सुरू झाली, पण दोन्ही संघांना गोल करण्यामध्ये सातत्याने अपयश येत होते. अखेर सामन्याच्या ७१व्या मिनिटाला अँडरलेच संघाच्या अँडी नाजरने ‘हेडर’ने गोल करत संघाचे खाते उघडले. पहिला गोल झाल्यावर अँडरलेचने बचाव अधिक भक्कम करण्याचा प्रयत्न केला. अर्सेनलचा संघ एकामागून एक आक्रमणे करत असला तरी त्यांच्या पदरी अपयश पडत होते. अटीतटीच्या या लढतीत अर्सेनल पराभूत होणार असे चित्र निर्माण झाले होते. पण अर्सेनलच्या खेळाडूंनी अखेरच्या काही मिनिटांमध्ये अद्भुत खेळाची प्रचीती देत संघासाठी विजयश्री खेचून आणत प्रशिक्षक आर्सेन वेंगर यांना वाढदिवसाची भेट दिली.
सामन्याच्या ८९व्या मिनिटाला किएरन गिब्सने गोल केला आणि अर्सेनलला हायसे वाटले. त्यानंतर ८४व्या मिनिटाला मैदानात आलेल्या पोडोलस्कीने अतिरिक्त वेळेत (इंज्युरी टाइममध्ये) ९१व्या मिनिटाला गोल करत संघाला अभूतपूर्व विजय मिळवून दिला.
संग्रहित लेख, दिनांक 24th Oct 2014 रोजी प्रकाशित
अर्सेनलच्या विजयाचा पोडोलस्की नायक
किरान गिब्ज आणि ल्युकास पोडोलस्की यांनी अखेरच्या तीन मिनिटांमध्ये साकारलेल्या दोन गोलच्या बळावर अर्सेनलने चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत अँडरलेचवर २-१ असा नाटय़मय विजय मिळवला.
First published on: 24-10-2014 at 01:28 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Champions league lukas podolski