वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेलच्या बाबतीत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. Emirates Airline चं कन्फर्म तिकीट असतानाही कंपनीच्या अधिकाऱ्यांनी गेलला विमान संपूर्ण भरल्याचं सांगत प्रवास नाकारला. इतकंच नाही तर तडजोड म्हणून विमानसेवा पुरवणाऱ्या कंपनीने बिझनेस क्लासचं तिकीट असतानाही गेलला इकोनॉमी क्लासने प्रवास करायला सांगितलं. संतापलेल्या गेलने हा प्रकार आपल्या ट्विटर अकाऊंटवर व्यक्त केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२०१९ सालात ख्रिस गेलने आपला अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. या सामन्यात गेलने ४२ चेंडूत ७२ धावा केल्या होत्या. भारताविरुद्ध मालिका खेळण्यासाठी गेलने आपल्या निवृत्तीची घोषणा मागे घेतली होती. त्यामुळे आगामी काळात गेल मैदानात दिसणार का हा त्याच्या चाहत्यांसाठी औत्सुक्याचा प्रश्न असणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chris gayle express disappointment over air lines company on twitter for bad services psd
First published on: 05-11-2019 at 13:09 IST