Rahul Dravid and VVS Laxman will not accompany Team India : भारत आणि आयर्लंड यांच्यात १८ ऑगस्टपासून टी-20 मालिका सुरू होणार आहे. तीन सामन्यांची ही मालिका डब्लिनमध्ये खेळवली जाणार आहे. टीम इंडियाने या मालिकेसाठी जसप्रीत बुमराहला कर्णधार बनवले आहे. भारताच्या आयर्लंड दौऱ्यापूर्वी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. या दौऱ्यात मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि त्याचा सपोर्ट स्टाफ बुमराहसोबत जाणार नाही. त्याचबरोबर व्हीव्हीएस लक्ष्मणही जाणार नाही.

क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि त्याच्या सपोर्ट स्टाफला विश्रांती देण्यात आली आहे. तो बराच काळ टीम इंडियासोबत काम करत असून त्याला ब्रेक घेता आला नाही. या कारणामुळे द्रविड टीम इंडियासोबत आयर्लंडला जाणार नाही. व्हीव्हीएस लक्ष्मणही त्यांच्यासोबत जाणार नाही. लक्ष्मण आणि द्रविड खूप अनुभवी आहेत. मात्र ते आयर्लंड दौऱ्यावर नसतील. यामुळे युवा खेळाडूंचे काही प्रमाणात नुकसान होऊ शकते. भारताने आयर्लंड दौऱ्यासाठी बहुतांश युवा खेळाडूंची निवड केली आहे.

Mumbai Indians Kieron Pollard and Tim David Fined 20 Percent Match Fees for Breaching IPL Code of Conduct
IPL 2024: पोलार्ड आणि टीम डेव्हिडवर आयपीएलकडून कारवाई, मुंबई-पंजाबमधील लाईव्ह सामन्यातील ‘ही’ चूक पडली महागात
IPL 2024 PBKS Vs RR Match Updates in Marathi
PBKS vs RR : संजू सॅमसनने धोनीप्रमाणे दाखवली चतुराई, लियाम लिव्हिंगस्टोनच्या ‘रनआऊट’चा VIDEO होतोय व्हायरल
Mohammad Amir and Imad Wasim Returns to Pakistan National Team
फिक्सिंग, बंदी आणि निवृत्तीनंतर मोहम्मद आमिर पुन्हा पाकिस्तानच्या टी-२० संघात
Hardik Pandya Rohit Sharma
हार्दिकचे कर्णधारपद धोक्यात? क्रिकेटवर्तुळात चर्चा; माजी क्रिकेटपटूंमध्ये मतमतांतरे

द्रविड-लक्ष्मण यांच्या अनुपस्थितीत टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफमध्ये सितांशु कोटक आणि साईराज बहुतुले यांना संधी दिली जाऊ शकते. साईराज हा टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू आहे. देशांतर्गत सामन्यांमध्ये त्याचा विक्रम चांगला आहे. साईराजचा कोचिंगमध्येही चांगला रेकॉर्ड आहे. सितांशु हा देशांतर्गत सामन्यांचा खेळाडू राहिला आहे. क्रिकेटमधून ब्रेक घेतल्यानंतर तो कोचिंगमध्ये व्यस्त आहे.

हेही वाचा – Asian Champions Trophy 2023: भारताने उपांत्य फेरीत जपानचा ५-० ने उडवला धुव्वा, आता अंतिम सामन्यात मलेशियाचे आव्हान

विशेष म्हणजे टीम इंडियाने ऋतुराज गायकवाड, यशस्वी जैस्वाल, तिलक वर्मा, रिंकू सिंग आणि वॉशिंग्टन सुंदर यांना आयर्लंड दौऱ्यासाठी संधी दिली आहे. शिवम दुबे, शाहबाज अहमद, संजू सॅमसन आणि जितेश शर्मा हे देखील संघात आहेत. तसेच बुमराहच्या खांद्यावर कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. आवेश खान, रवी बिश्नोई, मुकेश कुमार आणि प्रसिद्ध कृष्णा यांनाही संधी मिळाली आहे.

आयर्लंड आणि भारत टी-२० मालिकेचे वेळापत्रक –

पहिला सामना – १८ ऑगस्ट – संध्याकाळी ७:३० वा. मालाहाइड
दुसरा सामना – २० ऑगस्ट – संध्याकाळी ७:३० वा. मालाहाइड
तिसरा सामना – २३ ऑगस्ट – संध्याकाळी ७:३० वा. मालाहाइड