आतापर्यंत क्रिकेटमध्ये एखाद्या संघाचा डाव कोसळताना आपण पाहिलं असेल. काहीवेळा चांगली सुरुवात झाल्यानंतर एखाद्या संघाची फलंदाजी कोसळते, तर काहीदा पहिल्याच चेंडूपासुन फलंदाज एकामागोमाग एक माघारी परतण्यास सुरुवात होते. मात्र इंग्लंडच्या स्थानिक क्रिकेट क्लब सामन्यात High Wycombe क्रिकेट क्लबचा डाव, पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. ११ चेंडूत अवघी १ धाव काढून संघाचे ७ फलंदाज माघारी परतले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१९० धावांचा पाठलाग करताना High Wycombe क्रिकेट क्लबच्या संघाने आक्रमक सुरुवात केली होती. ३ गड्यांच्या मोबदल्यात १८६ धावांचा पल्ला गाठल्यानंतर संघाला विजयासाठी ३ धावांची आवश्यकता होती. मात्र हे साधं आव्हानही High Wycombe संघाला पेलवलं नाही. पुढच्या १२ चेंडूंमध्ये अवघी १ धाव काढून संघाचे उर्वरित फलंदाज माघारी परतले.

केरॉन जोन्स या गोलंदाजाने १९ व्या षटकात ४ बळी घेतले. यानंतर High Wycombe संघाला पुढचं आव्हान पेलवलं नाही. Peterborough संघाने सामना जिंकत ECB National Club Championship स्पर्धाही जिंकली

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cricket club loses seven wickets for one run in 11 balls
First published on: 26-06-2018 at 17:56 IST