क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्ड्सच्या मैदानावर २०१९ विश्वचषकाचा अंतिम सामना सुरु आहे. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडच्या भेदक माऱ्यासमोर न्यूझीलंडचा संघ २४१ धावांपर्यंतच मजल मारु शकला. मात्र दोन्ही संघ अंतिम फेरीत पोहचल्यानंतर लोकसत्ता ऑनलाईनने आपल्या वाचकांसाठी, अंतिम सामन्यात कोण बाजी मारेल यावर Voting Poll घेतला होता. यामध्ये वाचकांनी यजमान इंग्लंडच्या संघाला पसंती दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फेसबूकवर सुमारे दोन हजारहून अधिक लोकांनी आपली मतं दिली असून ६४ टक्के लोकांनी इंग्लंड अंतिम सामन्यात बाजी मारेल असं म्हटलं आहे. तर ३६ टक्के लोकांनी न्यूझीलंडला पसंती दिली आहे.

दरम्यान न्यूझीलंडकडून सलामीवीर हेन्री निकोल्सने झुंजार अर्धशतक झळकावलं. त्याला मधल्या फळीत टॉम लॅथमने चांगली साथ दिली. निकोल्सने ५५ तर लॅथमने ४७ धावा केल्या. न्यूझीलंडचे बाकीचे फलंदाज छोटेखानी खेळी करत माघारी परतले.

मराठीतील सर्व क्रिकेट वर्ल्ड कप 2019 बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cricket world cup 2019 ls poll readers voted for england to win final match vs nz psd
First published on: 14-07-2019 at 19:43 IST