२०१९ विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ, ICC ने आखून दिलेल्या नियमानुसार Home आणि Away सामन्याकरता वेगळी जर्सी घालून मैदानात उतरणार होता. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर भारतीय संघाच्या भगव्या जर्सीच्या चर्चा सुरु होत्या. बुधवारी संध्याकाळी ANI वृत्तसंस्थेने भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध सामन्यात भगव्या रंगाची जर्सी घालून उतरणार असल्याची माहिती दिली. मात्र अद्यापही या जर्सीवरुन सावळा गोंधळ सुरुच असल्याचं पहायला मिळतंय. विंडीजविरुद्ध सामन्याआधी भारतीय गोलंदाजी प्रशिक्षक भारत अरुण यांनी जर्सीबद्दल कोणतीही माहिती नसल्याचं सांगितलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“खरं सांगायचं तर आम्ही कोणत्या रंगाची जर्सी घालणार आहोत याची आम्हाला माहिती नाहीये. आम्ही या गोष्टीचा विचारही करत नाही. आमच्यासमोर गुरुवारी होणारा विंडीजचा सामना हे पहिलं उद्दीष्ट आहे. We Bleed Blue ! ” पत्रकारांनी जर्सीबद्दल विचारलेल्या प्रश्नाला भारत अरुण यांनी उत्तर दिलं. गुरुवारी भारत आणि विंडीज यांच्यात सामना होणार असून रविवारी भारतासमोर यजमान इंग्लंडचं आव्हान असणार आहे.

अवश्य वाचा – World Cup 2019 : विंडीजविरुद्ध सामन्यात भुवनेश्वर संघात हवाच ! कारण….

दरम्यान भारतीय संघाच्या या जर्सीवरुन देशामध्ये राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. समाजवादी पक्ष, काँग्रेसच्या काही नेत्यांनी भारतीय संघाच्या भगव्या जर्सीला विरोध दर्शवला आहे. त्यामुळे इंग्लंडविरुद्ध सामन्यात टीम इंडिया नेमकी कोणती जर्सी घालून मैदानात येते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अवश्य वाचा – World Cup 2019 : या धोनीचं करायचं काय? टीम इंडियाच्या मॅनेजमेंटसमोर गहन प्रश्न

मराठीतील सर्व क्रिकेट वर्ल्ड कप 2019 बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cricket world cup 2019 we bleed blue not aware of jersey colour vs england says bowling coach bharat arun psd
First published on: 26-06-2019 at 21:20 IST