क्रीडा आणि खेळाडूंवर अनेक चित्रपट आणि माहितीपट तयार करण्यात आले आहेत. आता असाच आणखी एक कुस्तीवर आधारित माहितीपट येत आहे. ऑलिम्पिकपदक विजेता कुस्तीपटू सुशील कुमारची कथा सांगणाऱ्या या चित्रपटाचे नाव ‘दंगल्स ऑफ क्राइम’ असे आहे. नियंता शेखरने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून हा चित्रपट कुस्ती आणि गुन्हेगारी जगतामधील दुवा शोधणार असल्याचे मत शेखरने दिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतातील पहिले एग्रीगेटेड रिअल लाईफ स्ट्रीमिंग अॅप डिस्कव्हरी प्लसवर ‘दंगल्स ऑफ क्राइम – द अनटोल्ड ट्रुथ अबाऊट इंडियन रेसलिंग’ हा माहितीपट पाहता येणार आहे. भारतातील कुस्तीचा विकास आणि या खेळाचा गुन्हेगारीशी कसा संबंध जोडला गेला, याचा सखोल अभ्यास या माहितीपटात करण्यात आला आहे.

हेही वाचा – VIDEO : “मला सचिनची दया येते, कारण…”, वाचा असं का म्हणाला शोएब अख्तर?

माजी कुस्तीपटू आणि प्रशिक्षक, प्रख्यात क्रीडा पत्रकार तसेच कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या अधिकार्‍यांनी यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. ‘दंगल्स ऑफ क्राइम’ हा माहितीपट दोन भागांत दाखवण्यात येईल. दिल्लीतील छत्रसाल स्टेडियमवर झालेल्या कुस्तीपटू सागर धनखर हत्या प्रकरणी सुशील कुमार सध्या अटकेत आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने मागील वर्षी २३ मे रोजी सुशीलसह त्याचा मित्र अजयला दिल्लीतील मुंडका येथून अटक केली होती.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dangals of crime discovery plus series explores wrestler sushil kumars descent into crime adn
First published on: 29-01-2022 at 20:24 IST