इंग्लंडचा प्रसिद्ध फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅम ऑस्ट्रेलियाच्या ए-लीगतर्फे खेळणार असल्याचे वृत्त बेकहॅम व्यवस्थापनाने फेटाळले आहे. ऑस्ट्रेलियाच्या ए-लीगमध्ये खेळण्यासाठी एका क्लबशी बेकहॅमची बोलणी सुरू असल्याचा दावा ऑस्ट्रेलिया फुटबॉल महासंघाने केला होता. मात्र यात तथ्य नसल्याचे बॅकहॅमच्या व्यवस्थापनाने स्पष्ट केले. बेकहॅमला करारबद्ध करण्यासाठी जगभरातील अनेक क्लब प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले. ऑस्ट्रेलियातील क्लबसाठी खेळण्याचा बेकहॅमचा सध्या तरी कोणताही विचार नाही. मेजर लीग सॉकरवरच त्याचे संपूर्ण लक्ष केंद्रित आहे. लॉसएंजेलिस गॅलेक्सी संघाला आणखी जेतेपदे मिळवून देण्याचा बेकहॅमचा इरादा असल्याचेही त्यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 17th Nov 2012 रोजी प्रकाशित
बेकहॅम ऑस्ट्रेलियातील ‘ए-लीग’मध्ये खेळणार नाही
इंग्लंडचा प्रसिद्ध फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅम ऑस्ट्रेलियाच्या ए-लीगतर्फे खेळणार असल्याचे वृत्त बेकहॅम व्यवस्थापनाने फेटाळले आहे. ऑस्ट्रेलियाच्या ए-लीगमध्ये खेळण्यासाठी एका क्लबशी बेकहॅमची बोलणी सुरू असल्याचा दावा ऑस्ट्रेलिया फुटबॉल महासंघाने केला होता.
First published on: 17-11-2012 at 01:45 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: David beckham has no plans to play in australias a league