Umpires career statistics be shown on TV screens: जेव्हा एखादा खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात फलंदाजी किंवा गोलंदाजी करण्यासाठी येतो, तेव्हा त्याच्या कारकिर्दीचे रेकॉर्ड टीव्ही स्क्रीनवर दाखवले जातात. जरा कल्पना करा, अंपायर्सच्या कारकिर्दीच्या नोंदी टीव्हीच्या पडद्यावर दाखवल्या गेल्या तर काय होईल? किती सामन्यात अंपायरिंग? किती योग्य निर्णय दिले आणि किती चुकीचे? किती निर्णयांसाठी रिव्ह्यू घेतले? ऑस्ट्रेलियाचा दिग्गज सलामीवीर डेव्हिड वॉर्नरला असेच हवे आहे. त्याने खेळाडूंप्रमाणे अंपायर्सचीही यांची ‘करिअर कुंडली’ पडद्यावर दाखवण्याची मागणी केली आहे.

सोमवारी लखनऊमध्ये ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेचा पाच गडी राखून पराभव केला. वेगवान गोलंदाज दिलशान मदुशंकाच्या चेंडूवर डेव्हिड वॉर्नरला एलबीडब्ल्यू आऊट देण्यात आले. या डावखुऱ्या फलंदाजाने रिव्ह्यू घेतला, पण अंपायर्स कॉलमुळे त्याला पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले. ११ धावांवर फलंदाजी करणाऱ्या वॉर्नरला हा निर्णय योग्य वाटला नाही आणि तो रागाच्या भरात मैदानाबाहेर गेला. तो त्याच्या पॅडवर बॅट मारताना दिसला. या सामन्यात जोएल विल्सन हे अंपायर्स होते.

Hardik Pandya Slapped With Fine Of 12 Lakh rupees By BCCI
मुंबई इंडियन्सचा विजय सेलिब्रेट करताना हार्दिक पंड्याला धक्का; ‘या’ साठी बीसीसीआयने ठोठावला १२ लाखांचा दंड
Boucher Pollard Argued With Umpire
MI vs CSK : चेन्नईविरुद्धच्या ‘लाइव्ह मॅच’मध्ये मुंबईच्या बाउचर, पोलार्ड आणि डेव्हिडने पंचांशी घातला वाद, पाहा VIDEO
IPL 2024 PBKS Vs RR Match Updates in Marathi
PBKS vs RR : संजू सॅमसनने धोनीप्रमाणे दाखवली चतुराई, लियाम लिव्हिंगस्टोनच्या ‘रनआऊट’चा VIDEO होतोय व्हायरल
IPL 2024 Gujarat Titans vs Punjab Kings Match Updates in Marathi
IPL 2024: “अरे २ ओव्हरमध्ये २४ धावा सहज होतील…” शशांक आणि आशुतोषने सांगितला किस्सा, शेवटच्या ओव्हरमध्ये काय झालं बोलणं, पाहा व्हीडिओ

अंपायर्सची आकडेवारी दाखवण्याची मागणी –

क्रिकबझच्या म्हणण्यानुसार, अंपायरिंगबाबत डेव्हिड वॉर्नर म्हणाला, “जेव्हा तुम्ही फलंदाजीसाठी बाहेर पडता तेव्हा खेळाडूंची आकडेवारी बोर्डवर दिसते. जेव्हा अंपायर्सची घोषणा केली जाते आणि ते पडद्यावर येतात, तेव्हा मला त्यांची आकडेवारीही बघायला आवडेल. आम्ही हे नॅशनल रग्बी लीग (एनआरएल) मध्ये पाहतो. मला माहित आहे की, हा एक जागतिक खेळ आहे, परंतु एनआरएल ती आकडेवारी दाखवते. मला वाटते की प्रेक्षकांनाही ते पाहायला आवडेल.”

हेही वाचा – Shane Bond: आयपीएलपूर्वी मुंबई इंडियन्सला मोठा धक्का, ‘या’ दिग्गज खेळाडूने नऊ वर्षानंतर सोडली संघाची साथ

काय म्हणाला डेव्हिड वॉर्नर?

डेव्हिड वॉर्नर पुढे म्हणाला, “खराब कामगिरीमुळे खेळाडूंना वगळले जाते. पॅनेलचे काय चालले आहे, हे आम्हाला कधीही सांगितले जात नाही. ही एक सूचना आहे. छोट्या छोट्या गोष्टी प्रेक्षकांना दिसतात. नेहमी बोलले जात, अंपायरिंग करणे सोपे नाही. पण हे सोपे का नाही? हे कशामुळे सोपे नाही तुम्ही समजावून सांगू शकता का? जेव्हा चांगले निर्णय घेतले जातात, तेव्हा हे स्पष्ट केले जाऊ शकते. म्हणून मला वाटते की हे असे काहीतरी आहे, जे केले जाऊ शकते.”

तंत्रज्ञान माहिती देते –

श्रीलंकेविरुद्ध एलबीडब्ल्यू आऊट झाल्याबद्दल वॉर्नर म्हणाला, “तंत्रज्ञान माहिती देते. माझ्या दृष्टीकोनातून ते तुमच्याकडे जास्त माहिती नसलेल्या ठिकाणी वापरण्यासाठी आहे. आता जर तुम्हाला एलबीडब्ल्यू आउट दिले गेले, तर तुमच्याकडे कदाचितच संधी असते. मी जोएलला विचारले की त्याने मला आऊट का दिले? तो म्हणाला चेंडू आत स्विंग होत होता. असे जर त्याला वाटत असेल तर म्हणूनच त्याने हा निर्णय घेतला. पण नंतर जेव्हा तुम्ही रिप्ले पाहता तेव्हा तुम्हाला थोडं आश्चर्य वाटलं. ते आमच्या नियंत्रणाबाहेर आहे. सांगण्यासारखं खूप काही आहे.”