भारतीय क्रिकेटमध्ये नवा इतिहास रचणारा सर्वाधिक यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा आज ७ जुलै वाढदिवस. क्रिकेट रसिकांचा हा ‘माही’ सध्या दुखापतग्रस्त असल्यामुळे भारतीय संघात त्याची उणीव भासत आहे. दबावात शांत चित्ताने विचारकरून योग्य निर्णय घेण्याची उत्तम क्षमता असलेल्या धोनीने भारतीय क्रिकेटला आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अव्वल स्थानावर नेऊन ठेवले.
कर्णधारम्हणून कामगिरी करताना त्याने पदार्पणातच भारताला टी-२० विश्वचषक विजेतेपदाला गवसणी घातली. त्यापाठोपाठ कसोटी क्रिकेटमध्ये अग्रस्थान आणि तब्बल २८ वर्षांतर भारतीय संघाने विश्वचषक जिंकला तोही धोनीच्या नेतृत्वाखालीच. त्यानंतर सध्या इंग्लंडमध्ये झालेल्या आयसीसीच्या चॅम्पियन्स करंडकाचे विजेतेपद आणि एकदिवसीय संघात आंतराष्ट्रीय क्रमवारीत गाठलेले अव्वल स्थान. ही सर्व धोनीचीच कीमया.
त्याच्या पदापर्णाच्या काळावर नजर टाकली असता, लांबसडक केसांचा लुक घेऊन संघाच्या मधल्या पट्टीत खेळणारा हाच तो फलंदाज. पण, आता धोनीचे रुपडे पालटले आहे. धोनीने फलंदाजीच्या बाबतीतले आपले आक्रमक रुप कायम राखले आहे. त्याने स्वत:च्या रुपात बदल केला तो अगदी जबाबदाऱ्या ओळखून हे महत्वाचे. क्रिकेट जगतात वेगवान प्रगती करणाऱया या खेळाडूला आकर्षणही वेगवान बाईक्सचे. नव्या-नव्या आणि वेगवान बाईक्सच्या ताफ्यात आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 7th Jul 2013 रोजी प्रकाशित
कॅप्टन कूल धोनीचा वाढदिवस
भारतीय क्रिकेटमध्ये नवा इतिहास रचणारा सर्वाधिक यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा आज ७ जुलै वाढदिवस. क्रिकेट रसिकांचा हा 'माही' सध्या दुखापतग्रस्त असल्यामुळे भारतीय संघात त्याची उणीव भासत आहे. दबावात शांत चित्ताने विचारकरून योग्य निर्णय घेण्याची उत्तम क्षमता

First published on: 07-07-2013 at 12:21 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dhoni birthday today