ग्लासगो येथे होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत यशस्वी पदार्पण करण्यासाठी दीपिका पल्लिकेल ही स्क्वॉशपटू उत्सुक आहे. गतवेळी तापामुळे नवी दिल्लीत झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेतून तिला माघार घ्यावी लागली होती. दीपिका ही महिला एकेरी, दुहेरी व मिश्र दुहेरी अशा तिन्ही प्रकारांमध्ये भाग घेत आहे. तिला प्रामुख्याने ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड व मलेशिया या देशांच्या खेळाडूंच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.
या स्पर्धेबाबत दीपिका म्हणाली की, ‘‘चार वर्षांपूर्वी ऐनवेळी मला आजारपणामुळे माघार घ्यावी लागली होती. त्यामुळे यंदाच्या स्पर्धेबाबत मला खूप उत्कंठा निर्माण झाली आहे. येथील स्पर्धेच्या वेळी मला क्रीडाग्राममध्येच थांबावे लागले होते. त्या वेळी मी खूप निराश झाले होते. त्यातही घरच्या प्रेक्षकांसमोर मला माझे कौशल्य दाखविता येत नाही, याचे दु:ख मला सलत होते. यंदा तिन्ही प्रकारांत पदक मिळवत या नैराश्यावर मात करण्याचे माझे ध्येय आहे. माझ्यावर थोडेसे दडपण आहे, मात्र चांगल्या कामगिरीचा आत्मविश्वासही आहे.’’
संग्रहित लेख, दिनांक 19th Jul 2014 रोजी प्रकाशित
यशस्वी राष्ट्रकुल पदार्पणासाठी दीपिका पल्लिकल उत्सुक
ग्लासगो येथे होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत यशस्वी पदार्पण करण्यासाठी दीपिका पल्लिकेल ही स्क्वॉशपटू उत्सुक आहे.

First published on: 19-07-2014 at 06:55 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dipika pallikal leaves painful past behind for long awaited commonwealth games