भारताच्या दिविज शरण आणि पुरव राजा या जोडीने क्लॅरो खुली टेनिस स्पर्धा या त्यांच्या पहिल्यावहिल्या एटीपी दर्जाच्या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत आगेकूच केली. चौथ्या मानांकित दिविज-राजा जोडीने इक्व्ॉडोरच्या इमिलो गोमेझ आणि कोलंबियाच्या क्िंवटरो जोडीवर ६-२, ६-२ अशी मात केली. दिविज-राजा जोडीने पहिल्या सेटमध्ये क्विंटरोची सव्‍‌र्हिस तीन वेळा भेदण्यात यश मिळवले. दुसऱ्या गेममध्ये या जोडीची सुरुवात चांगली झाली नाही, मात्र सलग सहा गुण मिळवीत या जोडीने दुसऱ्या सेटसह सामन्यावर कब्जा केला. दिविज-राजा जोडीने प्रतिस्पध्र्याच्या २९च्या तुलनेत ५६ गुणांची कमाई केली. पुढील फेरीत त्यांचा मुकाबला वासेक पॉसपिल-निकोलस मोन्रो आणि फॅबिआनो डी पॉला आणि सर्जिओ गाल्डोस यांच्यातील विजेत्या जोडीशी होणार आहे.