शेनझेन  टेनिस स्पर्धा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चीनमध्ये सुरू असलेल्या शेनझेन टेनिस स्पर्धेत भारताच्या रामकुमार रामनाथन याला एकेरीत पराभवाचा धक्का सहन करावा लागला. मात्र दुहेरीत साकेत मायनेनीच्या साथीने त्याने आगेकूच कायम ठेवली आहे.

इजिप्तच्या महम्मद सावत याच्याविरुद्ध खेळताना रामकुमार दोन गेममध्ये ६-७, ४-६ असा पराभूत झाला. या पराभवामुळे आता या स्पर्धेतील एकेरीत भारताच्या आशा केवळ शशीकुमार मुकुंदवर टिकून राहिल्या आहेत.

दरम्यान, दुहेरीत खेळताना रामकुमार आणि साकेत या जोडीने तृतीय मानांकित माओ झिन गॉँग आणि झे झॉग या जोडीचा ६-३, ३-६, १०-८ असा पराभव केला. तसेच जीवन नेदुचेझियान आणि एन. श्रीराम बालाजी या जोडीनेदेखील सफवात आणि अ‍ॅलेकसँड्र नेदोव्यसोव जोडीवर ७-५, २-६, १०-७ असा विजय मिळवत आगेकूच केली.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ending ramkumars lone challenge
First published on: 01-11-2018 at 04:20 IST