वृत्तसंस्था, दोहा : विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या जेतेपदासाठी इंग्लंडला प्रबळ दावेदार का मानले जाते आहे, याचा सोमवारी प्रत्यय आला. इंग्लंडने आपल्या सलामीच्या लढतीत इराणचा ६-२ असा धुव्वा उडवत विश्वचषक स्पर्धेला दिमाखदार सुरुवात केली. गॅरेथ साऊथगेट यांच्या मार्गदर्शनाखाली इंग्लंड एरवी ३-४-३ अशा संघरचनेसह खेळतो. मात्र, इराणवर दडपण टाकण्यासाठी साऊथगेट यांनी आक्रमक संघनिवड केली. त्यांनी चार आक्रमकपटूंसह खेळण्याचा निर्णय घेतला. आघाडीच्या फळीतील खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत इंग्लंडला पहिल्या सामन्यात मोठा विजय मिळवून दिला. इंग्लंडकडून बुकायो साकाने (४३ आणि ६२व्या मिनिटाला) दोन, तर ज्युड बेलिंगहॅम (३५व्या मि.), रहीम स्टर्लिग (४५व्या मि), मार्कस रॅशफोर्ड (७१व्या मि.) आणि जॅक ग्रिलिश (८९व्या मि.) यांनी प्रत्येकी एक गोल नोंदवला. इराणचे दोनही गोल आघाडीपटू मेहदी तारेमीने केले.

खलिफा स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात इंग्लंडच्या संघाने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला. सातत्याने केलेल्या या आक्रमणाचा इंग्लंडला ३५व्या मिनिटाला फायदा मिळाला. ल्युक शॉच्या क्रॉसवर १९ वर्षीय मध्यरक्षक बेलिंगहॅमने हेडरच्या साहाय्याने गोल करत इंग्लंडला आघाडी मिळवून दिली. यानंतर ४३व्या मिनिटाला प्रीमियर लीगमध्ये आर्सनलचे प्रतिनिधित्व करणाऱ्या साकाने, तर ४५ मिनिटांनंतरच्या भरपाई वेळेत चेल्सीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या स्टर्लिगने गोल केले. त्यामुळे मध्यंतराला इंग्लंडकडे ३-० अशी भक्कम आघाडी होती.

Boucher Pollard Argued With Umpire
MI vs CSK : चेन्नईविरुद्धच्या ‘लाइव्ह मॅच’मध्ये मुंबईच्या बाउचर, पोलार्ड आणि डेव्हिडने पंचांशी घातला वाद, पाहा VIDEO
Kolkata Knight Riders Vs Lucknow Supergiants Mathc Highlights in marathi
KKR vs LSG : कोलकाताचा ऐतिहासिक विजय! लखनऊचा ८ विकेट्सनी उडवला धुव्वा
Michael Vaughan Claims Rohit Sharma to join CSK next year
IPL 2024 : ‘पुढच्या वर्षी रोहित चेन्नईकडून खेळताना दिसणार…’, इंग्लंडच्या माजी कर्णधाराचा मोठा दावा
d Gukesh defeated Nijat Abasov in the Candidates chess tournament sport news
गुकेश संयुक्त आघाडीवर! पाचव्या फेरीत अबासोववर मात; अन्य भारतीयांच्या लढती बरोबरीत

उत्तरार्धात ६२व्या मिनिटाला साकाने वैयक्तिक दुसरा आणि इंग्लंडचा चौथा गोल केला. मोठय़ा फरकाने पिछाडीवर पडल्यानंतर इराणने आक्रमणाची गती वाढवण्याचा प्रयत्न केला. ६५व्या मिनिटाला मेहदी तारेमीने इराणचे गोलचे खातेही उघडले. मात्र, आक्रमणावर भर देताना इराणने बचावात चुका केल्या. ७१व्या मिनिटाला बदली खेळाडू म्हणून मैदानावर आलेल्या मार्कस रॅशफोर्डने पुढच्याच मिनिटाला इंग्लंडचा पाचवा गोल केला. त्यानंतर ग्रिलिशने आणखी एका गोलची भर घातली. सामना संपण्यास एक मिनिट असेपर्यंत गोल स्विकारणाऱ्या इराणला भरपाई वेळेतील अखेरच्या मिनिटाला पेनल्टीचा दिलासा मिळाला. या संधीवर तारेमीने केलेल्या गोलमुळे इराणला पराभवातील फरक कमी करण्याचे समाधान मिळाले. 

या सामन्यात १९ वर्षीय ज्युड बेलिंगहॅमने इंग्लंडचे गोलचे खाते उघडले. विश्वचषक स्पर्धामध्ये गोल करणारा इंग्लंडचा तो दुसरा सर्वात युवा खेळाडू ठरला.  

इंग्लंडला जागतिक स्पर्धामधील एका सामन्यात केवळ दुसऱ्यांदाच पाच किंवा त्यापेक्षा अधिक गोल मारण्यात यश आले. यापूर्वी इंग्लंडने २०१८च्या विश्वचषकात पनामाविरुद्ध ६-१ असा विजय मिळवला होता.

इराणमधील आंदोलनाचे विश्वचषकात पडसाद

इराणमध्ये २२ वर्षीय महिला महसा अमिनीच्या पोलीस कोठडीत झालेल्या मृत्यूनंतर सरकारविरुद्ध सुरू असलेल्या आंदोलनाचे पडसाद विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतही उमटले. आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामन्यांना सुरुवात होण्यापूर्वी दोनही संघ मैदानावर राष्ट्रगीत गातात. मात्र, इराण सरकार विरोधातील या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी इराणच्या खेळाडूंनी इंग्लंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी राष्ट्रगीत गाण्यास नकार दिला. इराणचे सर्व खेळाडू राष्ट्रगीताला केवळ उभे राहिले. सामना पाहण्यासाठी ‘ती’चा कतापर्यंत प्रवास इराणमध्ये महिलांना पुरुषांचे फुटबॉल सामने पाहण्यास बंदी आहे. पण इराणच्या मरियमला फुटबॉलच्या प्रेमाने कतापर्यंत खेचून आणले. इराणचा पहिला सामना पाहण्यासाठी मरियम तेहरानवरून कतारला आली. सामना प्रत्यक्ष मैदानावर पाहून तिचे भामन हरपून गेले. आजपर्यंत मी फुटबॉलचा सामना स्टेडियमवर जाऊन पाहिला नव्हता. आयुष्यातील स्वप्न साकार करण्यासाठी मी ही संधी साधली, अशी प्रतिक्रिया मरियमने दिली.