आर्सेनल, हॉटस्परला गोलशून्य बरोबरीवर समाधान

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सॅडिओ मॅने (२० मि.) आणि फिलीप कुटिन्हो (३५ मि.) यांच्या प्रत्येकी एक गोलच्या जोरावर लिव्हरपूलने इंग्लिश प्रीमिअर लीग फुटबॉल स्पध्रेत वेस्ट ब्रॉमविचवर २-१ असा विजय मिळवून गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी झेप घेतली. ब्रॉमविचच्या गॅरेथ मॅकअ‍ॅलीने ८१व्या मिनिटाला गोल करून लिव्हरपूलला अव्वल स्थानावर जाण्यापासून रोखले.

गुणतालिकेत अव्वल असलेल्या आर्सेनल क्लबला मागे टाकण्यासाठी लिव्हरपूलला दोन गोलच्या फरकाने विजय मिळवणे आवश्यक होते. त्यांनी ८०व्या मिनिटापर्यंत २-० अशी आघाडी घेत त्यादृष्टीने वाटचालही केली होती, परंतु मॅकअ‍ॅलीच्या गोलने त्यांना दुसऱ्या स्थानावरच समाधान मानण्यास भाग पाडले. तत्पूर्वी, झालेल्या सामन्यात आर्सेनलला मिडलब्रूहने गोलशून्य बरोबरीत रोखले, तर चौथ्या स्थानावर असलेल्या टॉटनहॅम हॉटस्परलाही बॉर्नमाऊथविरुद्ध गोलशून्य बरोबरीवरच समाधान मानावे लागले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: English premier league liverpool
First published on: 24-10-2016 at 02:42 IST