लिओनेल मेस्सीने आपल्या जादुई कामगिरीच्या जोरावर अर्जेंटिनाला अंतिम फेरीत नेले आहे. त्याच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिनाचा संघ दुसऱ्यांदा अंतिम सामना खेळणार आहे. शेवटच्या वेळी २०१४ मध्ये त्यांच्या संघाला विजेतेपदाच्या लढतीत जर्मनीकडून पराभव पत्करावा लागला होता. लुसेल स्टेडियमवर अर्जेंटिनाने गतवेळच्या उपविजेत्या क्रोएशियाचा ३-० असा पराभव केला. आता अंतिम फेरीत त्याचा सामना याच मैदानावर गतविजेता फ्रान्स किंवा मोरोक्कोशी १८ डिसेंबर रोजी होईल.

अर्जेंटिनाचा संघ सहाव्यांदा अंतिम फेरीत पोहोचला आहे. यापूर्वी १९३० मध्ये उरुग्वेकडून त्यांचा पराभव झाला होता. १९७८ च्या फायनलमध्ये अर्जेंटिनाने नेदरलँड्सचा पराभव करून पहिल्यांदा विजेतेपदावर कब्जा केला. त्यानंतर १९८६ मध्ये त्यांनी अंतिम फेरीत पश्चिम जर्मनीचा पराभव केला. त्यानंतर १९९० मध्ये पश्चिम जर्मनीविरुद्ध विजेतेपदाच्या लढतीत पराभव पत्करावा लागला होता. त्याचवेळी २०१४ मध्येही त्यांचा जर्मनीकडून पराभव झाला होता.

मेस्सीची जादुई कामगिरी –

या सामन्यात मेस्सीने चमकदार कामगिरी केली. त्याने ३४व्या मिनिटाला पेनल्टीवर संघासाठी पहिला गोल केला. त्याच्यानंतर ज्युलियन अल्वारेझने ३९व्या मिनिटाला गोल केला. त्यानंतर पुन्हा मेस्सीने ६९व्या मिनिटाला अप्रतिम खेळ दाखवत क्रोएशियाच्या अनेक खेळाडूंना चकमा देत गोलपोस्ट गाठले. तेथे त्याला गोल करण्यासाठी जागा मिळाली नाही आणि त्याने अल्वारेझच्या दिशेने चेंडू मारला. अल्वारेझने आपला दुसरा आणि संघाचा तिसरा गोल केला. मेस्सीच्या शानदार असिस्टसाठी हा गोल दीर्घकाळ स्मरणात राहील.

तत्पूर्वी, पहिल्या सत्रात लिओनेल मेस्सीने 34व्या मिनिटाला पेनल्टीवर गोल करत अर्जेंटिनाला सामन्यात १-० अशी आघाडी मिळवून दिली. अर्जेंटिनाचा स्ट्रायकर ज्युलियन अल्वारेझ चेंडू घेऊन गोलपोस्टकडे जात होता. तो गोलपोस्टजवळ येताच त्याला क्रोएशियन गोलकीपर लिव्हकोविकने खाली आणले. रेफ्रींनी लिव्हाकोविचला येलो कार्ड दाखवून अर्जेंटिनाला पेनल्टी बहाल केली.

विश्वचषकाच्या इतिहासातील मेस्सीचा ११वा गोल –

क्रोएशियन खेळाडूंनी या पेनल्टीला कडाडून विरोध केला. मातेओ कोव्हासिक यानेही निषेध नोंदवल्याबद्दल त्याला येलो कार्ड दाखवण्यात आले. पंचांनी आपला निर्णय मागे घेतला नाही. अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेस्सी पेनल्टी घेण्यासाठी आला आणि त्याने जोरदार शॉट गोलपोस्टमध्ये लगावला. विश्वचषकाच्या इतिहासातील मेस्सीचा हा ११वा गोल आहे.

त्यानंतर अर्जेंटिनासाठी ज्युलियन अल्वारेझने दुसरा गोल केला. त्याने ३९व्या मिनिटाला चेंडू गोलपोस्टमध्ये टाकला. अल्वारेझने क्रोएशियाच्या मिडफिल्डमधून एकट्याने तोडल्याने पुढे गेला. त्यानेही बचाव फोडला आणि गोलरक्षक लिव्हकोविचला चीतपट करत शानदार गोल केला. ज्यामुळे पहिल्या सत्रात अर्जेंटिनाचा संघ २-० ने पुढे गेला.

हेही वाचा – FIFA World Cup 2022 : मोरोक्कोची सर्वात मोठी कसोटी!; आज उपांत्य फेरीत गतविजेत्या फ्रान्सला नमवण्याचे आव्हान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुसऱ्या सत्रात अर्जेंटिनाने तोच आक्रमक खेळ पुढे सुरु ठेवला. क्रोएशिया बरोबरी साधण्याचा प्रयत्न करेल असे सर्व फुटबॉल प्रेमींना वाटत होते. पण त्यासाठी त्यांना लवकरात लवकर दोन गोल करावे लागणार होते. पण तेवढ्यात लिओनेल मेस्सीने सामन्यातील दुसरा आणि ६९व्या मिनिटाला संघासाठी तिसरा गोल केला. मेस्सीने जबरदस्त खेळ दाखवत स्वत:साठी संधी निर्माण केली. तो गोलपोस्टच्या जवळ आला आणि क्रोएशियन गोलरक्षक लिव्हकोविचला भेदत त्याने गोल केला. लिव्हकोविकने त्याचा फटका रोखण्याचा प्रयत्न केला पण तो अपयशी ठरला.