दक्षिण कोरियापाठोपाठ रशियाला नमवून अल्जेरियाला बाद फेरीत धडक मारण्याची संधी आहे. रशियाविरुद्ध विजय मिळवल्यास विश्वचषकाच्या बाद फेरीत पोहोचण्याची ऐतिहासिक संधी त्यांना लाभू शकेल.
दक्षिण कोरियाला हरवून तब्बल ३२ वर्षांनी त्यांनी विश्वचषकातील पहिलावहिला विजय मिळवला होता. या धर्तीवर रशियाविरुद्ध विजय मिळवण्याची अल्जेरियाला संधी आहे. प्रतिस्पध्र्याच्या बचावपटूंना स्थिरावू न देता आक्रमक खेळ हे अल्जेरियाचे वैशिष्टय़ आहे. कोरियाविरुद्धच्या लढतीप्रमाणेच संघाने सर्वोत्तम कामगिरी करावी, असे आवाहन अल्जेरियाचा कर्णधार मादजीद बौघेराने केले आहे. दुसरीकडे रशियाने कोरियाविरुद्ध बरोबरी केली होती तर बेल्जियमने त्यांच्यावर विजय मिळवला होता. विजयाची बोहनी करत गणितीय समीकरणांच्या जोरावर बाद फेरी गाठण्यासाठी रशिया प्रयत्नशील आहे. बेल्जियमविरुद्धचा पराभव विसरून सर्वोत्तम खेळ करू, असा विश्वास रशियाचा बचावपटू अलेकसेई कोझलोव्हने व्यक्त केला.

सामना क्र. व८
‘ह’ गट :
अल्जेरिया वि. रशिया
स्थळ :  क्युरिटिबा, एरिना पॅन्टॅनल
सामन्याची वेळ : मध्यरात्री १.३० वा.