बाद फेरीत स्थान पटकावलेल्या बेल्जियम संघाला दक्षिण कोरियाविरुद्धच्या लढतीत सरावाची संधी मिळणार आहे. २००२च्या विश्वचषकात अंतिम चौघांमध्ये धडक मारणाऱ्या दक्षिण कोरियाला बेल्जियमविरुद्ध चमत्काराची अपेक्षा आहे. त्यांची रशियाविरुद्धची लढत बरोबरीत सुटली होती, तर अल्जेरियाने त्यांच्यावर दणदणीत विजय मिळवला होता. यामुळे दक्षिण कोरियाचा बाद फेरीचा रस्ता खडतर झाला आहे.
आक्रमण आणि बचाव या दोन्ही आघाडय़ांवरील दक्षिण कोरियाच्या त्रुटी स्पष्ट झाल्या आहेत. बेल्जियमला ईडन हॅझार्डकडून मोठय़ा अपेक्षा आहेत. डिव्होक ओरिगी, थिबुट कौटिअस, व्हिन्सेंट कॉम्पनी, रोमेलू ल्युकाकू ही चौकडी बेल्जियमसाठी महत्त्वपूर्ण आहे. या सामन्यात विजयासह गटात निर्विवाद वर्चस्व साधण्यासाठी बेल्जियम आतूर आहे.
सामना क्र. ४७
‘ह’ गट :
बेल्जियम वि. द. कोरिया
स्थळ : साओ पावलो, एरिना द साओ पावलो
वेळ : रात्री १.३० वा.