अल थुमामा (कतार) : उत्तरार्धात सामन्याच्या अखेरच्या टप्प्यात केलेल्या दोन गोलच्या जोरावर मोरोक्कोने रविवारी विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत एफ गटात धक्कादायक निकालाची नोंद करताना बलाढय़ बेल्जियमला २-० असे पराभूत केले.

पहिल्या सामन्यात विजय मिळविणाऱ्या बेल्जियमच्या बाद फेरी गाठण्याच्या आशांनाही धक्का बसला.  त्यांच्या आशा क्रोएशियाच्या प्रवासावर अवलंबून राहतील. मोरोक्कोने पहिल्या बरोबरीनंतर या विजयाने बाद फेरी प्रवेशाच्या आपल्या आशा कायम ठेवल्या.

Confirmed Rohit Sharma does not stay with Mumbai Indians team in Mumbai
रोहित शर्माने सांगितलं मुंबई इंडियन्सच्या संघासह न राहण्याचं कारण; म्हणाला, “आता माझ्या हातात तर..”
Devon Conway Out Of IPL 2024
IPL 2024 : चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का! ‘हा’ स्टार खेळाडू दुखापतीमुळे IPL मधून बाहेर
IPL 2024 What Was That Thing on MS Dhoni Strapped on His Ankle
IPL 2024: मॅचनंतर धोनीच्या पायाला काय बांधण्यात येतं?
IPL 2024 Lucknow Mumbai Indians vs Rajasthan Royal Match Updates in Marathi
IPL 2024 MI vs RR: रियान परागचं आईने केलं कौतुक; लेकाला पुन्हा घातली ऑरेंज कॅप, पाहा VIDEO

काहीशा आक्रमक झालेल्या सामन्यात तब्बल २४ फाऊल झाले. यात मोरोक्कोकडून १४, तर बेल्जियमकडून १० फाऊल नोंदवले गेले. गोल करण्याच्या संधी शोधण्यात वेळ गेल्यामुळे पूर्वार्धातील खेळात गोल होऊ शकले नाहीत. उत्तरार्धातही परिस्थिती फारशी वेगळी नव्हती. एकाही संघाला चेंडूवर सफाईदारपणे नियंत्रण राखता आले नाही.

सामन्याच्या ७३व्या मिनिटाला अब्देलहमीद साबिरीने थेट फ्री-किकवर गोल करून मोरोक्कोला आघाडीवर नेले. विश्वचषक स्पर्धेत फ्री-किकवरील आजपर्यंतचा मोरोक्कोचा पहिला गोल केला. त्यानंतर भरपाई वेळेत झकारिया अबुखलालने झियेचच्या पासवर चेंडूला अचूक गोलजाळीची दिशा दिली. बेल्जियमच्या डझार्डने सामन्यात गोल करण्याच्या चार संधी निर्माण केल्या. मात्र, त्या पूर्णत्वाला नेण्यात बेल्जियमच्या खेळाडूंना अपयश आले.

मोरोक्कोने विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात दुसऱ्यांदा उत्तरार्धात दोन गोल करून विजय मिळविला. यापूर्वी १९९८ मध्ये त्यांनी अशी कामगिरी स्कॉटलंडविरुद्ध केली होती.