आयकॉनिक कलिंगा हॉकी स्टेडियमवर शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या एफआयएच (FIH) हॉकी प्रो लीग २०२२-२०२३ च्या उद्घाटन सामन्यात भारतीय हॉकी संघ न्यूझीलंडशी लढण्यासाठी सज्ज झाला आहे. ओडिशा हॉकी विश्वचषक भुवनेश्वर-राउरकेला २०२३ मध्ये खेळला जाईल. पहिल्या सामन्याविषयी न्यूझीलंडविरुद्धच्या तयारीबद्दल बोलताना भारतीय हॉकीचे मुख्य प्रशिक्षक ग्रॅहम रीड म्हणाले, “गेल्या काही आठवड्यांपासून आम्ही प्रो लीगमधील चार सामने आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या तयारीत व्यस्त आहोत.”

प्रशिक्षक ग्रॅहम रीड पुढे म्हणाले की, “हे सर्व सामने आमच्या विश्वचषकाच्या तयारीचा एक भाग आहेत. आमची सर्वोत्कृष्ट हॉकी खेळणे हे निश्चितच आमचे उद्दिष्ट आहे, परंतु आम्हाला आमच्या आक्रमणात आणखी चांगली कामगिरी करायची आहे. आम्ही आमचा हल्ला ज्या प्रकारे पार पाडतो त्याप्रमाणे आम्ही काही नवीन गोष्टी करून पाहणार आहोत, म्हणून आम्ही या सामन्यांची वाट पाहत आहोत.”

Who is fast bowler Sandeep Sharma
IPL 2024 : पाच सामन्यांनंतर परतला आणि मुंबई इंडियन्सच्या डावाला खिंडार पाडणारा संदीप शर्मा कोण?
Hardik Pandya Slapped With Fine Of 12 Lakh rupees By BCCI
मुंबई इंडियन्सचा विजय सेलिब्रेट करताना हार्दिक पंड्याला धक्का; ‘या’ साठी बीसीसीआयने ठोठावला १२ लाखांचा दंड
Despite the efforts of PR Sreejesh the Indian hockey team lost
श्रीजेशच्या प्रयत्नांनंतरही भारतीय हॉकी संघाचा पराभव
IPL 2024 Rajasthan Royals vs Royal Challengers Banglore Match Updates in Marathi
IPL 2024: आधी चहलच्या गोलंदाजीवर लगावला षटकार अन् मग केली थोबाडीत मारण्याची अ‍ॅक्शन, VIDEO होतोय व्हायरल

हेही वाचा :   T20 World Cup 2022 : झिम्बाब्वेच्या विजयानंतर कॉमेंटेटर पोम्मी म्बांगवाचा ‘हा’ व्हिडिओ होतोय व्हायरल, पाहा

भारताचा दुसरा सामना ३० ऑक्टोबरला स्पेनशी होणार आहे. पुढील आठवड्यात भारताचा तिसरा सामना ४ नोव्हेंबरला न्यूझीलंडशी होणार असून, ६ नोव्हेंबरला पुन्हा स्पेनशी खेळणार आहे. कर्णधार हरमनप्रीत सिंगने आपल्या भावना व्यक्त केल्या, “जो गेल्या मोसमात एफआयएच प्रो लीगचा सर्वाधिक गोल करणारा हॉकी खेळाडू ठरला होता. तो म्हणाला, “गेला विश्वचषकाचा हंगाम आमच्यासाठी चांगला होता आणि आम्ही गेल्या मोसमात जिथे सोडले होते तिथून सुरु करत पुढे जाण्याचे आमचे ध्येय आहे,” असे तो म्हणाला.

हेही वाचा :   T20 World Cup: टांगा पलटी घोडे फरार! षटकार मारलेला चेंडू कॅच पकडायला गेला अन्…; पाहा Video

हरमनप्रीत सिंग म्हणाला, ” नवीन मोसमात पहिल्याच सामन्यापासून आम्हाला योग्य रणनीती आखून त्याप्रमाणे खेळ करायचा आहे. जानेवारीत होणाऱ्या विश्वचषकाच्या स्पर्धेपूर्वी हे सामने आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत.” घरच्या मैदानावर भारताचा सामना करण्याबाबत बोलताना न्यूझीलंडचे मुख्य प्रशिक्षक ग्रेग निकोल म्हणाले, “येथे पुढील काही महिन्यांत होणारा भारतात होणाऱ्या विश्वचषकाच्या अनुषंगाने, ओडिशातील प्रो लीगमध्ये हे सामने खेळणे हा एक मोठा प्लस पॉइंट आहे, जेणेकरून आमच्या खेळाडूंना वातावरण समजून घेताना मदत होईल.”