विंडीजच्या मार्गात श्रीलंकेचा अडथळा

सलग दोन पराभवांनंतर विंडीजने कामगिरीत सुधारणा करताना बांगलादेशवर तीन धावांनी निसटता विजय मिळवला.

अबू धाबी : गतविजेता वेस्ट इंडिजचा संघ ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेतील आव्हान कायम राखण्यास प्रयत्नशील असून गुरुवारी त्यांच्या मार्गात श्रीलंकेचा अडथळा आहे.

सलग दोन पराभवांनंतर विंडीजने कामगिरीत सुधारणा करताना बांगलादेशवर तीन धावांनी निसटता विजय मिळवला. या विजयामुळे त्यांना उपांत्य फेरीच्या शर्यतीत टिकून राहण्यात यश आले. मात्र, दोन वेळच्या विजेत्या विंडीजची निव्वळ धावगती गटात सर्वात कमी असून त्यांना अखेरचे दोन्ही सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागणार आहेत.

ड्वेन ब्राव्हो, जेसन होल्डर आणि आंद्रे रसेल यांच्यावर विंडीजच्या गोलंदाजीची भिस्त आहे. त्यांच्या फलंदाजांची श्रीलंकन फिरकी जोडी वानिंदू हसरंगा आणि महीष थीकसना यांच्यासमोर कसोटी लागेल.

’ वेळ : सायं ७.३० वा.

’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोटर्स १, १ हिंदी

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Former champions west indies have won the twenty20 world cup sri lanka semi finals akp

ताज्या बातम्या