तेलगू टायटन्सच्या माजी कबड्डीपटूचं अपघाती निधन

रस्तेे अपघातात गमावला जीव

एस. महालिंगम दबंग दिल्लीविरुद्धच्या सामन्यात (उजवीकडून दुसरा)

प्रो-कबड्डीत तेलगू टायटन्स संघाकडून खेळणाऱ्या एस. महालिंगम या खेळाडूचं अपघाती निधन झालं आहे. ९ सप्टेंबररोजी झालेल्या एका अपघातात महालिंगमला आपले प्राण गमवावे लागले आहेत. तेलगू टायटन्सकडून महालिंगम डाव्या कोपऱ्यावर खेळायचा. भक्कम बचाव आणि आक्रमक चढायांसाठी ओळखल्या जाणाऱ्या महालिंगमने अनेक सामन्यांमध्ये तेलगू टायटन्सला विजय मिळवून दिला आहे. चौथ्या पर्वात चांगली कामगिरी करुनही महालिंगमवर पाचव्या पर्वात कोणतीही बोली लावण्यात आली नव्हती. सहाव्या पर्वात महालिंगमचं नाव खेळाडूंच्या यादीत समाविष्ट करण्यात आलं नव्हतं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Former telegu titans player s mahalingam passes away

ताज्या बातम्या