Gautam Gambhir on Gavaskar and Sehwag: भारतीय संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने पान मसाल्याच्या जाहिरातीवरून वीरेंद्र सेहवाग आणि सुनील गावसकर यांसारख्या दिग्गजांवर निशाणा साधला आहे. तो म्हणाला की, “सेहवागसारखे दिग्गज त्याचे समर्थन करत आहेत ही अत्यंत निराशाजनक आणि वाईट गोष्ट आहे.” गौतम गंभीरच्या म्हणण्यानुसार, लोक तुम्हाला तुमच्या कामाने ओळखतात आणि त्यामुळे असे कोणतेही काम करू नये.

भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने माजी कर्णधार सुनील गावसकर आणि दिग्गज सलामीवीर वीरेंद्र सेहवाग यांच्यावर ताशेरे ओढले आहेत. वास्तविक, नुकतेच या दोन्ही क्रिकेटपटूंनी एका पान मसाला जाहिरातीत काम केले होते. असाच प्रकार गंभीरच्या बाबतीत घडला आहे. गंभीरच्या मते, लोक तुम्हाला तुमच्या कामानुसार ओळखतात. त्यामुळे असे कोणतेही काम करू नये. पैसा मिळवणे हेच आमचे एकमेव ध्येय असू नये, अशी टीका गंभीरने केली आहे. पैसे कमवण्याचे इतर मार्ग आहेत. पान मसाल्याचीच जाहिरात केली पाहिजे असे नाही.

Former Zimbabwean cricketer Guy Whittle
Guy Whittall : धक्कादायक! माजी क्रिकेटरवर बिबट्याचा जीवघेणा हल्ला, कुत्र्याने वाचवला जीव, रक्ताने माखलेला फोटो व्हायरल
IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
IPL 2024: धोनीच्या वादळी खेळीने आनंद महिंद्राही झाले चकित, माहीचे कौतुक करताना म्हणाले, “कृतज्ञ आहे की माझं नाव Mahi-ndra…”
IPL 2024 Lucknow Super Gitans vs Gurajat Titans Match Updates in Marathi
IPL 2024: चित्त्याच्या चपळाईने बिश्नोईने टिपला झेल, सारेच झाले अवाक; पाहा व्हीडिओ
Uddhav Thackrey Kundli Shine In Loksabha Elections Till 2027
“उद्धव ठाकरेंच्या पत्रिकेतच पुरावा, लोकसभेत शिवसेनेला..”, ज्योतिषांची मोठी भविष्यवाणी

हेही वाचा: India Tour of WI: भारतीय संघाचा वेस्ट इंडिज दौरा जाहीर! युवा खेळाडूंना आजमावण्याची संधी, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

२०११ आणि २००७चा विश्वचषक विजेत्या संघाचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात म्हणाला की, “माझ्याकडे दोन शब्द आहेत, घृणास्पद आणि निराशाजनक. घृणास्पद कारण मला वाटले नव्हते की एखादा खेळाडू त्याच्या आयुष्यात पान मसाल्याची जाहिरात करेल हे मी स्वप्नात सुद्धा विचार करू शकत नाही. दुसरे म्हणजे इतक्या मोठ्या दिग्गज खेळाडूंनी अशी जाहिरात करणे ही गोष्ट माझ्यासाठी निराशाजनक आहे.”

पुढे गंभीर म्हणाला, “ही बाब निराशाजनक आहे कारण, मी तुम्हाला फक्त एकच गोष्ट सांगतो की तुमचा आदर्श हुशारीने निवडा. नावापेक्षा काम महत्त्वाचे आहे. तुम्ही तुमच्या कामानुसार ओळखले जातात. नावाने नाही.” गोतम पुढे म्हणाला, “पैसा इतका महत्त्वाचा नाही की तुम्हाला पान मसाल्यासाठी काम करावे लागेल. पैसे कमवण्याचे अनेक मार्ग आहेत. तुम्ही देशातील तरुणांसाठी आदर्श आहात. म्हणूनच अशा ऑफर नाकारण्याचे धैर्य तुमच्यात असले पाहिजे.”

हेही वाचा: WTC 2023 Final: “… सिर्फ घर मे शेर!” सुनील गावसकरांनी प्रशिक्षक राहुल द्रविडवर साधला निशाणा

गौतम गंभीरने सचिन तेंडुलकरचे दिले उदाहरण

गौतम गंभीरने पुढे सचिन तेंडुलकरचे उदाहरण दिले की त्याने किती कोटी रुपये कसे नाकारले. तो म्हणाला, “सचिन तेंडुलकरने सांगितले की, त्याला २०-३० कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती. पण त्याने वडिलांना वचन दिले होते की, तो तंबाखू किंवा माना मसाल्याला प्रोत्साहन देणार नाही. म्हणूनच ते रोल मॉडेल आहेत आणि आम्हाला अशा रोल मॉडेल्सची आणखी गरज आहे.”