India vs Australia, WTC 2023 Final: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) च्या अंतिम सामन्यात भारतीय संघाच्या फलंदाजांची अत्यंत खराब कामगिरी पाहायला मिळाली. दोन्ही डावात टीम इंडियाचे फक्त दोन खेळाडू ५० पेक्षा जास्त धावा करू शकले. या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने भारताचा २०९ धावांनी पराभव केला. त्याचवेळी अंतिम सामन्यातील पराभवानंतर भारताचे माजी दिग्गज खेळाडू सुनील गावसकर यांनी टीम इंडियाच्या फलंदाजांच्या कामगिरीवर जोरदार टीका केली आहे.

अंतिम सामन्यातील भारतीय संघाच्या फलंदाजांच्या खराब कामगिरीबाबत मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी विधान केले की, “परदेशी खेळपट्ट्यांवर कोणत्याही फलंदाजाची सरासरी कमी असणे सामान्य आहे.” द्रविडच्या या वक्तव्यावर सुनील गावसकर यांच्याकडून तिखट प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “सिर्फ घर मे शेर हो. म्हणजेच तुम्ही फक्त घरात शेर आहात आणि बाहेर ढेर. घरातच तुम्ही दादा असून तिथेच तुमची दादागिरी चालणार.”

Ashutosh Sharma's Reaction After Defeat
‘त्या प्रशिक्षकांना मी आवडत नसे, ते मला संघात घेत नसत. यामुळे मी नैराश्यात गेलो’, आशुतोष शर्माचा संघर्ष
Boucher Pollard Argued With Umpire
MI vs CSK : चेन्नईविरुद्धच्या ‘लाइव्ह मॅच’मध्ये मुंबईच्या बाउचर, पोलार्ड आणि डेव्हिडने पंचांशी घातला वाद, पाहा VIDEO
Despite the efforts of PR Sreejesh the Indian hockey team lost
श्रीजेशच्या प्रयत्नांनंतरही भारतीय हॉकी संघाचा पराभव
Mohammad Amir and Imad Wasim Returns to Pakistan National Team
फिक्सिंग, बंदी आणि निवृत्तीनंतर मोहम्मद आमिर पुन्हा पाकिस्तानच्या टी-२० संघात

स्टार स्पोर्ट्सवरील राहुल द्रविडच्या या वक्तव्याबाबत सुनील गावसकर पुढे म्हणाले की, “इतर संघांच्या फलंदाजांची सरासरी काय आहे याने काही फरक पडू नये. आपण भारतीय संघाबद्दल बोलत आहोत. त्याची सरासरी सतत घसरत आहे आणि त्यासाठी काहीतरी केले पाहिजे. परदेश दौऱ्यांवर फलंदाजांच्या खराब कामगिरीमुळे टीम इंडियाला प्रत्येक वेळी अडचणीत आणले जाते. तसेच, यामुळे समालोचन करताना देखील दुसऱ्या देशांच्या खेळाडूंकडून खूप ऐकून घ्यावे लागते. यामुळे भारताचे नुकसान होत आहे.”

हेही वाचा: WTC 2023 Final: “आम्ही आधीच मानसिकदृष्ट्या हरलो होतो जेव्हा…’, टीम इंडियाच्या पराभवावर वीरेंद्र सेहवागने डागली तोफ

लिटिल मास्टर गावसकर पुढे म्हणाले की, “आमच्या संघात असे फलंदाज आहेत ज्यांची क्षमता पाहता ते सामना एकहाती जिंकू शकतात. तो भारतीय खेळपट्ट्यांवर चांगली फलंदाजी करतो. पण परदेशी खेळपट्ट्यांवर त्याची कामगिरी अपेक्षेपेक्षा उलट दिसते. तो भारतात दादा असतो, पण परदेशात येताच सैरभैर होऊ लागतो.”

रोहित शर्माला सरावाच्या मुद्यावर दिले सडेतोड उत्तर

सुनील गावसकर म्हणाले की, “प्रत्येक संघाला माहित आहे की डब्ल्यूटीसी सायकलमध्ये फक्त एकच अंतिम फेरी खेळली जाते. आयपीएलमध्ये हे खेळाडू बेस्ट ऑफ थ्रीविषयी बोलतात का? नाही ना. WTCमध्ये फक्त एकच अंतिम फेरी खेळण्याची योजना फार आधीपासून आहे. जेव्हा तुम्ही ही यात खेळायला सुरुवात करता तेव्हाच तुम्हाला याची कल्पना देण्यात आलेली असते. अशा परिस्थितीत, हे सर्व कारणे शोधण्याचे एक निमित्त आहे, मानसिक तयारी करावी लागेल. जसे तुम्ही आयपीएल फायनलसाठी सज्ज होता. आपण आज तीन सामन्यांच्या मालिकेची मागणी करू शकत नाही. आज तुम्ही बेस्ट ऑफ थ्री मागत आहात उद्या तुम्ही बेस्ट ऑफ ५ मागणी कराल.”

हेही वाचा: WTC 2023 Final: “आयसीसी ट्रॉफी जिंकणे हा लहान …”, पराभवानंतर रवी शास्त्रींनी धोनीची आठवण काढत रोहितला मारला टोमणा

खराब फटकेबाजीमुळे भारतीय फलंदाजांनी विकेट गमावल्या

डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यात भारतीय संघाच्या फलंदाजांनी खराब शॉट्स खेळताना विकेट गमावल्या. यामध्ये कर्णधार रोहित शर्माने दुसऱ्या डावात नॅथन लायनविरुद्ध स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी स्कॉट बोलँडच्या आउटगोइंग चेंडूवर विराट कोहलीने स्लिपमध्ये त्याचा झेल सोपवला. याशिवाय पॅट कमिन्सच्या चेंडूवर फटकेबाजी करताना चेतेश्वर पुजाराने आपली विकेट गमावल्याची कल्पनाही कोणी केली नव्हती.