जबरदस्त फॉर्मात असलेल्या थॉमस म्युलरच्या एकमेव गोलच्या जोरावर जर्मनीने शेवटच्या साखळी लढतीत अमेरिकेवर १-० असा विजय मिळवला. या विजयासह जर्मनीने गटातील अव्वल स्थानासह बाद फेरी गाठली. दुसरीकडे पराभव पदरी पडूनही अमेरिकेला बाद फेरीत स्थान मिळवले आहे. कारण पोर्तुगालला अपेक्षित गोलफरकाने आपला विजय साकारता आला नाही.
सामन्याच्या दुसऱ्याच मिनिटाला बोइटंगच्या क्रॉसवर गोल करण्याचा थॉमस म्युलरचा प्रयत्न चुकला. १५व्या मिनिटाला थॉमस म्युलर आणि फिलीप ल्हाम यांनी सुंदर पद्धतीने चेंडूला खेळवत बोइटंगकडे सोपवला. मात्र तो अयशस्वी ठरला. पुढच्याच मिनिटाला थॉमस म्युलरचा गोलचा प्रयत्न अमेरिकेचा गोलरक्षक ओमार गोन्झालेझने थोपवला. २२व्या मिनिटाला अमेरिकेच्या मायकेल ब्रॅडलेने झुसीला पास दिला. झुसीचा प्रयत्न गोलपोस्टच्या वरून गेला. ३६व्या मिनिटाला मेस्युट ओझिलने शिताफीने चेंडूवर नियंत्रण मिळवले. मात्र गोल करताना झालेल्या चुकीमुळे गोन्झालेझने हा प्रयत्न रोखला. ४८व्या मिनिटाला जर्मनीच्या बोइटंगचा क्रॉसचा फटका मिरोस्लाव्ह क्लोजकडे गेला. मात्र गोन्झालेझने अचूकतेने हा प्रयत्न थोपवला. ५५व्या मिनिटाला मेस्युट ओझिलच्या कॉर्नरवर म्युलरने हेडरद्वारे गोल केला. परंतु अमेरिकेचा गोलरक्षक हॉवर्डने हा प्रयत्न रोखला. मात्र चेंडूला पुन्हा उसळी मिळाली आणि म्युलरने चपळाईने गोल करत जर्मनीचे खाते उघडले. विश्वचषकाच्या नवव्या लढतीतला म्युलरचा हा नववा गोल आहे. श्वाइनस्टायगर आणि मेस्युट ओझिल यांचे एकत्रित प्रयत्न गोलसाठी अपुरे ठरले. आतापर्यंत अमेरिकेसाठी हुकूमी एक्का ठरलेल्या क्लिंट डेम्पसेला या सामन्यात मात्र आपली जादू दाखवता आली नाही.
संग्रहित लेख, दिनांक 27th Jun 2014 रोजी प्रकाशित
लढत गमावूनही बढत
जबरदस्त फॉर्मात असलेल्या थॉमस म्युलरच्या एकमेव गोलच्या जोरावर जर्मनीने शेवटच्या साखळी लढतीत अमेरिकेवर १-० असा विजय मिळवला.
First published on: 27-06-2014 at 01:28 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Germany beat usa