scorecardresearch

IPL 2022 पूर्वीच ग्लेन मॅक्सवेलची नव्या इनिंगला सुरुवात; विनी रमनशी बांधली लग्नगाठ

दोघांनी इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत आणि त्याला ‘मिस्टर आणि मिसेस मॅक्सवेल’ असे कॅप्शन दिले.

Glenn Maxwell marries girlfriend Vini Raman
ग्लेन मॅक्सवेलने त्याच्या लग्नातील फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल आयपीएल २०२२ च्या आगामी हंगामातील पहिल्या काही सामन्यांमध्ये खेळू शकणार नाही. ही बातमी ऐकून चाहत्यांना नक्कीच धक्का बसेल, पण मॅक्सवेल सध्या खूश आहे. ऑस्ट्रेलियाचा स्फोटक अष्टपैलू खेळाडू असलेल्या ग्लेन मॅक्सवेलने भारतीय वंशाची मैत्रीण विनी रमनसोबत लग्नगाठ बांधली आहे. मॅक्सवेल आणि विनी यांचा विवाह १८ मार्चला एका खाजगी समारंभात झाला. दोघांनी इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत आणि त्याला ‘मिस्टर आणि मिसेस मॅक्सवेल’ असे कॅप्शन दिले. २०२० मध्ये विनी आणि मॅक्सवेलचा साखरपुडा झाला होता.

विनी आणि मॅक्सवेल २०१७ पासून एकत्र आहेत. वाईट काळातही विनी मॅक्सवेलसोबत राहिली. मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असलेल्या मॅक्सवेलला विनीने बाहेर काढले. त्यामुळे मॅक्सवेलच्या हृदयात विनीचे विशेष स्थान आहे. मूळची दक्षिण भारतातील असलेली विनी व्यवसायाने फार्मासिस्ट आहे.

विनी आणि ग्लेन मॅक्सवेल यांच्यात अप्रतिम बॉन्डिंग आहे. विनीनेच त्याला मानसिक समस्येवर मात करण्यास मदत केली होती असे मॅक्सवेलने एकदा सांगितले होते. मानसिक त्रासामुळे मॅक्सवेलला मधल्या काळात क्रिकेटमधून ब्रेक घ्यावा लागला होता. विनीने एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये त्यांच्या नात्याबद्दल सांगितले होते. मॅक्सवेलने त्याला सर्वप्रथम प्रपोज केले होते, असेही विनीने सांगितले होते.

कोण आहे विनी रमन

विनी रमन भारतीय वंशाची असून मेलबर्नमध्ये राहते. विनी मेलबर्नमध्येच शिकत आहे. या दोघांच्या भेटीचे अनेक फोटोज बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहेत. २०१७ मध्ये या जोडप्याचे फोटो पहिल्यांदा सोशल मीडियावर आले होते. २०१९ मध्ये ऑस्ट्रेलियन क्रिकेट पारितोषिक समारंभात मॅक्सवेल देखील रमणसोबत दिसला होता.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Glenn maxwell marries girlfriend vini raman abn

ताज्या बातम्या