जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानी

सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर भारताची ग्रँडमास्टर द्रोणावली हरिकाने जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानी झेप घेतली. तिने पाच स्थानांच्या सुधारणेसह ही मजल मारली.

Delhi has the highest number of land transactions in the country
देशात जमिनीचे सर्वाधिक व्यवहार दिल्लीत
candidates chess gukesh takes sole lead by beating alireza firouzja
गुकेशचे अग्रस्थान भक्कम; नेपोम्नियाशी, नाकामुरा, कारुआना संयुक्त दुसऱ्या स्थानी; अखेरची फेरी शिल्लक 
novak djokovic
जोकोविचकडून फेडररचा विक्रम मोडीत; क्रमवारीत अग्रस्थानी राहिलेला सर्वात वयस्क टेनिसपटू
Vidit Gujarathi defeated Hikaru Nakamura in the Chess Candidates competition sport news
विदितचा नाकामुराला धक्का; गुकेशचा प्रज्ञानंदवर विजय; हम्पीची सलग दुसरी बरोबरी

चेंगडू येथे नुकत्याच पार पडलेल्या फिडे महिला ग्रा. प्रि. स्पध्रेत हरिकाने जेतेपद पटकावले होते आणि सध्या ती चीन बुद्धिबळ लीगमध्ये खेळत आहे. मंगळवारी तिने सलग तिसऱ्या विजयाची नोंद करून शँडाँग संघाला अव्वल स्थानी कायम राखण्यात मदत केली. तिने डू यूस्किनचा सहज पराभव केला. ‘‘प्रतिस्पर्धी खेळाडूने चांगला संघर्ष केला, परंतु तिच्याकडून काही चुका झाल्या. त्याचाच फायदा उचलत मी विजय मिळवला,’’ असे हरिका म्हणाली.

 

आठवडाभरात ऑलिम्पिक गावाचे काम पूर्ण होईल

संयोजकांची ग्वाही; ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या वास्तव्याला नकारानंतर सुधारणेला वेग

एएफपी, रिओ डी जनेरो

तुंबलेली शौचालये, घातक विद्युतवाहिन्यांचा पसारा आणि इतर समस्यांमुळे सध्या रिओ ऑलिम्पिक ग्राम चर्चेत आहे. त्यामुळेच ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी येथे राहण्यास नकार दिला. याची गंभीर दखल घेत येत्या आठवडाभरात ही सर्व कामे पूर्ण केली जातील, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. ‘‘ही सर्व कामे पूर्ण करण्यासाठी ६३० कामगारांचा ताफा कार्यरत आहे. या आठवडय़ाच्या अखेरीस कामे पूर्ण होतील,’’ अशी माहिती ब्राझीलच्या आयोजन समितीचे प्रवक्ते मारियो अँड्राडा यांनी ट्विटरवरून दिली.