भारतीय पुरुष हॉकी संघाचा बचावपटू हरमनप्रीत सिंगची शुक्रवारी येथे सलग दुसऱ्यांदा पुरुष गटात एफआयएच प्लेयर ऑफ द इयर म्हणून निवड करण्यात आली. नेदरलँड्सचा ट्युएन डी नूझियर, ऑस्ट्रेलियाचा जेमी ड्वायर आणि बेल्जियमचा आर्थर व्हॅन डोरेन यांच्या एलिट यादीत सामील होऊन सलग दोन वर्षे पुरूष गटात वर्षातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार जिंकणारा हरमनप्रीत चौथा खेळाडू आहे.

आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनने एका निवेदनात म्हटले आहे की, “हरमनप्रीत आधुनिक काळातील हॉकी सुपरस्टार आहे. प्रतिस्पर्ध्याचा पराभव करण्यासाठी योग्य वेळी योग्य ठिकाणी पोहोचण्याची उत्कृष्ट क्षमता असलेला तो एक तल्लख बचावपटू आहे. हरमनप्रीतला २९.४ गुण मिळाले, त्यानंतर थियरी ब्रिंकमनने २३.६ आणि टॉम बूनने २३.४ गुण मिळवले. भारतीय उपकर्णधार हरमनप्रीतने एफआयएच हॉकी प्रो लीग २०२१-२२ मध्ये दोन हॅटट्रिकसह १६ सामन्यांमध्ये १८ गोल केले आहेत.

Kevin Pietersen's big statement on Sanju Samson
IPL 2024 : “जर मी निवडकर्ता असतो तर…”, इंग्लंडचा माजी दिग्गज केविन पीटरसनचे संजू सॅमसनबाबत मोठं वक्तव्य
Indian Women Badminton Team gets off to a winning start sport news
भारतीय महिला बॅडमिंटन संघाची विजयी सुरुवात
D gukesh
‘टोरंटोत भारतीय भूकंप’; कँडिडेट्स’ विजेत्या गुकेशचे कास्पारोवकडून कौतुक; विजयाचे श्रेय आनंदलाही
IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
MI vs CSK: आयपीएल २०२४ मध्ये ऋतु’राज’, मुंबईविरूद्ध विस्फोटक फलंदाजीसह ‘हा’ विक्रम करणारा पहिला भारतीय खेळाडू

हेही वाचा :   T20 World Cup 2022: जसप्रीत बुमराहच्या जागी मोहम्मद शमी, पुढील २-३ दिवसांत ऑस्ट्रेलियाला रवाना होईल

या १८ गोलांसह, तो मोसमाच्या शेवटी भारतासाठी सर्वाधिक गोल करणारा खेळाडू राहिला आणि प्रो लीगमध्ये एकाच मोसमात सर्वाधिक गोल करण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे. गेल्या वर्षी ढाका येथे झालेल्या आशियाई चॅम्पियन्स चषकामध्ये हरमनप्रीतने सहा सामन्यांत आठ गोल केले होते. बर्मिंगहॅम २०२२ राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक विजेत्या भारतीय संघासाठीही त्याने महत्त्वाची भूमिका बजावली.

हेही वाचा :  प्रो-कब्बडी लीग: प्रो-कब्बडी लीगच्या नवव्या हंगामात दबंग दिल्ली, बेंगलुरु बुल्स आणि युपी यौद्धाज यांची विजयी सलामी 

महिला गटात नेदरलँडच्या फेलिस अल्बर्सला एफआयएचची सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून निवडण्यात आले. महिला गटात एफआयएच सर्वोत्कृष्ट खेळाडू पुरस्कार जिंकणारी ती जर्मनीच्या नताशा केलर (१९९९) नंतर सर्वात तरुण खेळाडू ठरली. अल्बर्सचे एकूण २९.१ गुण आहेत, त्यांनी मारिया ग्रॅनाटो (२६.९ गुण) यांना मागे टाकले आहे. ऑगस्टिना गोर्गेलानी १६.४ गुणांसह तिसरे स्थान पटकावले.