नवी दिल्ली : जागतिक कनिष्ठ विजेत्या हिमा दासने पाठीच्या दुखापतीमुळे आगामी जागतिक अजिंक्यपद अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेतून माघार घेतली आहे.‘‘दोहा येथे होणाऱ्या जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेतून हिमाला पाठीच्या दुखापतीमुळे दुर्दैवी माघार घ्यावी लागत आहे,’’ अशी माहिती भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाचे अध्यक्ष आदिल सुमारीवाला यांनी दिली. २७ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर या कालावधीत होणाऱ्या स्पर्धेत हिमाचा ४ बाय ४०० मीटर महिला आणि ४ बाय ४०० मीटर मिश्र रिले संघात समावेश करण्यात आला होता. जिस्ना मॅथ्यू, एमआर पूवम्मा, रेवती वीरमणी, शुभा व्यंकटेशन, व्ही. के. विस्मया आणि राजराज विथया यांचा महिलांच्या रिले संघात समावेश आहे. याचप्रमाणे मिश्र संघात जिस्ना, पूवम्मा, विस्मया, जेकॉब अमोज, मोहम्मद अनास आणि नोआह तोम निर्मल यांचा समावेश आहे. धावपटू द्युती चंदला १०० मीटर शर्यतीसाठी नंतर भारतीय संघात स्थान देण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दोहा येथे एप्रिल महिन्यात झालेल्या आशियाई अजिंक्यपद अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेतील ४०० मीटर शर्यतीतून हिमाला अर्धवट माघार घ्यावी लागली होती.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hima das ruled out of world athletics championship due to back problem zws
First published on: 19-09-2019 at 02:53 IST