MS Dhoni and Kavya Maran Video : एमएस धोनी, हे असे नाव आहे जे यष्टीच्या मागे उभारुन फलंदाजांमध्ये भीती निर्माण करण्यात पटाईत आहे. मग ते विकेटकीपिंग असो किंवा त्याचा मास्टरमाइंड. चेन्नई विरुद्ध हैदराबाद यांच्यातील सामन्यातही धोनीची अशीच हुशारी पाहायला मिळाली. आयपीएल २०२४ मध्ये आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेली हैदराबादची टीम कॅप्टन कूलच्या मास्टरमाईंडसमोर अपयशी ठरले, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये धोनीने स्फोटक ट्रॅव्हिस हेडला आपल्या जाळ्यात अडकवल्यानंतर निराशा झालेली पाहायला मिळाली.

हैदराबादचे सलामीचे फलंदाज ट्रॅव्हिस हेड आणि युवा अभिषेक शर्मा यांनी आपल्या स्फोटक फलंदाजीने यंदाच्या हंगामात गोलंदाजांना घाम फोडताना दिसले. त्यामुळे या दोघांची फटकेबाजी चेन्नईविरुद्धही पाहायला मिळणार असल्याची अटकळ बांधली जात होती. पण ट्रॅव्हिस हेड धोनीच्या मास्टरमाईंडसमोर फटकेबाजी करण्यात अयशस्वी ठरला. व्हिडीओमध्ये धोनीने डॅरिल मिशेलला नेमक्या जागेवर उभे केले होते.


त्यानंतर तुषार देशपांडेने वाइड लाइनमध्ये यॉर्कर टाकला आणि हेडने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि मिशेलच्या हाती झेलबाद झाला. या विकेटनंतर आपल्या संघाला सपोर्ट करण्यासाठी आलेली काव्या मारन निराश होऊन सीट बसताना दिसली. या व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चाहते धोनीच्या या मास्टरमाईंडचे कौतुक करत आहेत.

हेही वाचा – T20 WC 2024 : ‘कोणताही कर्णधार किंवा निवडकर्ता ‘या’ खेळाडूकडे दुर्लक्ष करू शकत नाही’: आकाश चोप्राचं मोठं वक्तव्य

कर्णधार ऋतुराजने खेळली शानदार खेळी –

सनरायझर्स हैदराबादविरुद्ध चेन्नई सुपर किंग्जकडून उत्कृष्ट फलंदाजी पाहायला मिळाली. कर्णधार ऋतुराज गायकवाडने १० चौकार आणि ३ षटकारांसह ९८ धावांची शानदार खेळी साकारली. डॅरिल मिशेलनेही अर्धशतकी खेळी खेळली. शेवटी शिवम दुबेच्या स्फोटक ३९ धावांमुळे संघाला २१२ धावांपर्यंत मजल मारता आली. ज्यामुळे त्यांचा संघ १३४ धावांवरच गारद झाला. मात्र, प्रत्युत्तरात सनरायझर्स हैदरबाद संघाची फलंदाज अत्यंत खराब दिसून आली. ज्यामुळे त्यांचा संघ १३४ धावांवरच गारद झाला. हैदराबादच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी करत आली नाही. त्यामुळे या विजयाच्या जोरावर चेन्नईने प्लेऑफच्या शर्यतीत पुन्हा मुसंडी मारली आहे.