आजपासून उपांत्य फेरीचा थरार

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अत्यंत चुरशीच्या सामन्यात बलाढय़ नेदरलँड्सविरुद्ध २-१ असा पराभव पत्करावा लागल्याने यजमान भारताचे गुरुवारी विश्वचषक हॉकी स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. मात्र प्रसिद्ध हिंदी चित्रपटातील ‘द शो मस्ट गो ऑन’ या वाक्याप्रमाणे विश्वचषक आता उपांत्य फेरीच्या टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. भारताच्या पराभवानंतरही चाहत्यांमधील उत्साह कमी झाला नसून शनिवारपासून सुरू होणाऱ्या उपांत्य फेरीत गतविजेत्या ऑस्ट्रेलिया व बेल्जियमला अंतिम फेरीत स्थान मिळवण्याची सर्वाधिक संधी आहे, असे म्हटले जात आहे.

पहिल्या उपांत्य सामन्यात इंग्लंड विरुद्ध बेल्जियम एकमेकांविरुद्ध उभे ठाकणार असून विश्वचषकाच्या इतिहासात प्रथमच उपांत्य फेरी गाठण्यात यश मिळवलेल्या बेल्जियमपासून इंग्लंडला सावधान राहावे लागणार आहे. इंग्लंडने ‘ब’ गटातून उत्तम कामगिरी करत दुसरे स्थान मिळवले. त्याशिवाय त्यांनी अर्जेटिनाला उपांत्यपूर्व लढतीत धूळ चारली. तर ‘क’ गटातून बेल्जियमने जर्मनीला २-१ असे नमवून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.

दुसऱ्या सामन्यात बलाढय़ ऑस्ट्रेलियासमोर झुंजार वृत्तीच्या नेदरलँड्सचे आव्हान असणार आहे. ऑस्ट्रेलियाने ‘ब’ गटात प्रथम क्रमांक मिळवलाच, त्याशिवाय उपांत्यपूर्व सामन्यात फ्रान्सला ३-० असे नामोहरम करून गतविजेत्यांच्या थाटात उपांत्य फेरीत धडक मारली. त्यामुळे नेदरलँड्सला कांगारूंना हरवण्यासाठी अथक प्रयत्न करावे लागतील.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hockey world cup
First published on: 15-12-2018 at 01:36 IST