scorecardresearch

Premium

भारत विजयाची बोहनी करणार?

लागोपाठ दोन सामन्यांमधील पराभव व त्यानंतर स्पेनशी झालेली बरोबरी यामुळे भारताला अद्यापही विश्वचषक हॉकी स्पर्धेत अपेक्षेइतके यश मिळविता आलेले नाही.

लागोपाठ दोन सामन्यांमधील पराभव व त्यानंतर स्पेनशी झालेली बरोबरी यामुळे भारताला अद्यापही विश्वचषक हॉकी स्पर्धेत अपेक्षेइतके यश मिळविता आलेले नाही. त्यामुळे पहिला विजय मिळविण्यासाठी भारताला शनिवारी मलेशियाविरुद्ध सर्वोत्तम कौशल्य दाखवावे लागणार आहे.
या स्पर्धेतील साखळी गटात भारताने तीन सामन्यांमध्ये केवळ एक गुण मिळविला आहे तर मलेशियाला तीन सामन्यांत एकही गुण पटकाविता आलेला नाही. या दुबळ्या संघांमधील लढतीबाबत फारशी उत्सुकता नाही. मात्र भारतीय संघ पहिला विजय मिळविण्यासाठी कसे प्रयत्न करून दाखवितो हेच या लढतीमधील औत्सुक्य असेल.
आजपर्यंत भारताने मलेशियाविरुद्धच्या लढतींमध्ये वर्चस्व गाजविले आहे. त्यामुळे या लढतीसाठी भारताचेच पारडे जड आहे. साखळी गटात शेवटच्या स्थानाची नामुष्की टाळण्यासाठी मलेशियाचे खेळाडू जिद्दीने खेळतील असा अंदाज आहे. यानंतर भारताला शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलियासारख्या बलाढय़ संघाशी खेळावे लागणार आहे तर मलेशियाची स्पेनशी गाठ पडणार आहे.  

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Hockey world cup india vs malaysia

First published on: 07-06-2014 at 05:22 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×