यष्टींमागून धोनी आपल्या गोलंदाजाना नेहमी सुचना देत असताना आपण सामन्यादरम्यान पाहिलं आहे. कोणताही आक्रस्ताळेपणा न करता शांत डोक्याने धोनी प्रतिस्पर्धी संघाला मात देत सामन्यात बाजी मारुन जातो. यावेळी आपल्या कर्णधारपदाच्या काळात आपण संघातील खेळाडूंना कधीही प्रतिस्पर्धी खेळाडूला आई-बहिणीवरुन शिव्या देण्याची परवानगी दिली नाही. “आज काल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हा प्रकार सहज चालतो. मात्र मी माझ्या खेळाडूंना प्रतिस्पर्ध्यांना शिवी देण्याची मूभा दिली, तर सामना संपल्यानंतर संपूर्ण दिवस ही गोष्ट त्यांना सतावत राहिलं.” पुस्तकात धोनीने आपल्या कर्णधारपदाच्या शैलीबद्दल माहिती दिली आहे.
२००८ साली ऑस्ट्रेलियाविरुद्धची वन-डे मालिका असो किंवा आयपीएलमध्ये खेळताना चेन्नईच्या संघाची यशस्वीरित्या बांधलेली मोट असो, प्रत्येक गोष्टींत धोनीने आपला खास टच दाखवून दिला आहे. याव्यतिरीक्त धोनीच्या क्रिकेट कारकिर्दीशी निगडीत अनेक घटनांचा Indian Express चे प्रतिनिधी भारत सुंदरेसन यांनी आपल्या पुस्तकामध्ये समावेश केला आहे.