ICC Champions Trophy 2025 Venues and Grounds: अखेर प्रतिक्षा संपली अन् आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५चं वेळापत्रक जाहीर केलं आहे. बीसीसीआय आणि पीसीबी यांच्यातील चर्चेला पूर्णविराम लागला असून आता आयसीसीने अखेर स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले. आयसीसीने यापूर्वीच ही स्पर्धा हायब्रिड मॉडेलमध्ये खेळवणार असल्याचे जाहीर केले होते. या स्पर्धेला १९ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. पहिला सामना न्यूझीलंड आणि यजमान पाकिस्तान यांच्यात कराची येथे होणार आहे. तर बहुप्रतिक्षित असा भारत-पाकिस्तान सामना २३ फेब्रुवारीला होणार आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेला १९ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. पहिला सामना न्यूझीलंड आणि यजमान पाकिस्तान यांच्यात कराची येथे होणार आहे. फायनल ९ मार्च रोजी होणार आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे टीम इंडिया आपले सर्व सामने दुबईत खेळणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना २३ फेब्रुवारीला दुबईत होणार आहे. तर यजमान पाकिस्तानमधील रावलपिंडी, कराची आणि लाहोर या तीन शहरांमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने खेळवले जाणार आहेत.

हेही वाचा – IND vs AUS: भारत-ऑस्ट्रेलिया मेलबर्न कसोटी पहाटे किती वाजता सुरू होणार? ४.३०ला होणार नाणेफेक

पाकिस्तानमध्ये होणाऱ्या या स्पर्धेसाठी भारत सरकारने टीम इंडियाला पाकिस्तानात जाण्याची परवानगी दिली नाही. यामुळे बीसीसीआयने ही स्पर्धा हायब्रीड मॉडेलमध्ये आयोजित करण्याची मागणी केली होती. गेल्या अनेक दिवसांपासून दोन्ही देशांच्या क्रिकेट बोर्डांमध्ये या मुद्द्यावरून वाद सुरू होता. त्यामुळे स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर होण्यास सुमारे महिनाभराचा विलंब झाला. आता ही स्पर्धा हायब्रिड मॉडेलमध्ये खेळण्यास सहमती दिल्यानंतर आयसीसीनेही वेळापत्रकाला मान्यता दिली आहे.

हेही वाचा – Vinod Kambli Video: “मी सचिनचा आभारी आहे, त्याचं…”, विनोद कांबळींचं हॉस्पिटलमध्ये असताना लाडक्या मित्राबाबत वक्तव्य, तब्येतीचे दिले अपडेट

चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने ८ संघांमध्ये खेळवले जातील, ज्याची दोन गटात विभागणी केली आहे. प्रत्येक गटात ४ संघ आहेत.
अ गट – पाकिस्तान, भारत, न्यूझीलंड, बांगलादेश

ब गट – दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, इंग्लंड

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वेळापत्रकातील ठळक मुद्दे

भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीचे सर्व सामने दुबईमध्ये खेळणार आहे. जर भारतीय संघ या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला तर फायनल दुबईमध्ये होईल.

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. ९ मार्चला जर सामना खेळवला गेला नाही तर १० मार्चला सामना होऊ शकतो.

चॅम्पियन्स ट्रॉफीचे सर्व सामने भारतीय वेळेनुसार दुपारी २.३० वाजता खेळवले जातील.

चॅम्पियन्स ट्रॉफीचं वेळापत्रक

१९ फेब्रुवारी- पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड, कराची

२० फेब्रुवारी- भारत विरुद्ध बांगलादेश, दुबई

२१ फेब्रुवारी- अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका, कराची

२२ फेब्रुवारी- ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड, लाहोर

२३ फेब्रुवारी-पाकिस्तान विरुद्ध भारत, दुबई

२४ फेब्रुवारी- बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड, रावळपिंडी

२५ फेब्रुवारी- ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका, रावळपिंडी.

२६ फेब्रुवारी- अफगाणिस्तान विरुद्ध इंग्लंड, लाहोर.

२७ फेब्रुवारी- पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश, रावळपिंडी.

२८ फेब्रुवारी- अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया, लाहोर.

१ मार्च- दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड, कराची.

२ मार्च- न्यूझीलंड विरुद्ध भारत, दुबई

४ मार्च- उपांत्य फेरी १, दुबई

५ मार्च- उपांत्य फेरी २, लाहोर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

९ मार्च- अंतिम सामना- लाहोर/दुबई.