इंग्लंड विरुद्ध बांगलादेश सामन्यात, इंग्लंडच्या फलंदाजांनी आक्रमक सुरुवात करत पहिल्या डावावर पूर्णपणे आपलं वर्चस्व राखलं. सलामीवीर जेसन रॉय आणि जॉनी बेअरस्टो यांनी पहिल्या विकेटसाठी १२८ धावांची भागीदारी केली.

अवश्य वाचा – तू देशाऐवजी पैशाला प्राधान्य दिलंस, शोएब अख्तरची डिव्हीलियर्सवर बोचरी टीका

जॉनी बेअरस्टो मश्रफी मोर्ताझाच्या गोलंदाजीवर माघारी परतला. यानंतर जेसन रॉयने जो रुटच्या मदतीने आपलं शतक पूर्ण केलं. यावेळी शतकी धाव घेताना रॉयने पंचांना चुकीने धडक मारली, ज्यामुळे पंच जोएल विल्सन थेट जमिनीवर पडले. दरम्यान जेसन रॉयचं विश्वचषकातलं हे पहिलं शतक ठरलं.

शतक झळकावल्यानंतर काही क्षणांमध्ये जेसन रॉय माघारी परतला. मेहदी हसनच्या गोलंदाजीवर फटकेबाजी करताना रॉय मश्रफी मोर्ताझाच्या हाती झेल देऊन बाद झाला. त्याने १२१ चेंडूत १५३ धावांची खेळी केली. या खेळीत १४ चौकार आणि ५ षटकारांचा समावेश होता.