भारतीय संघ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत सध्या ५ पैकी ४ सामने जिंकून ९ गुणांवर आहे. भारतीय संघाने अद्याप एकही सामना गमावलेला नाही. भारताचे पहिल्या फेरीतील एकूण ४ सामने शिल्लक आहेत. या ४ सामन्यांपैकी किमान २ सामने भारताने जिंकले तर भारताचे सेमीफायनलचे तिकीट निश्चित होणार आहे. अशा परिस्थितीत भारतीय संघ पाकच्या संघाला सेमीफायनलापासून वंचित ठेवण्यासाठी काही सामने जाणूनबुजून हरू शकते, असा आरोप पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू बासित अली यांनी केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पाकिस्तानच्या एका कार्यक्रमात बासित अली याला क्रिकेट जाणकार म्हणून बोलवण्यात आले होते. यावेळी सूत्रसंचालकाने त्यांना विचारले की पाकिस्तानचा सेमीफायनलचा मार्ग रोखण्यासाठी भारताचा संघ मुद्दाम सामने पराभूत होईल का? या प्रश्नावर उत्तर देताना बासित अली म्हणाले की पाकिस्तान सेमीफायनलमध्ये जाऊ नये म्हणून भारत मुद्दाम श्रीलंका आणि बांगलादेश यांच्याविरोधात होणार सामना पराभूत होईल. ऑस्ट्रेलियादेखील मुद्दाम भारताविरुद्ध सामना हरला. एवढेच नाही तर १९९२ च्या विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडचा संघ जाणूनबुजून पाकिस्तान विरोधात पराभूत झाला होता. कारण त्यांना सेमीफायनलचा सामना त्यांच्या भूमीत खेळायचा होता, असा आरोप बासित अली यांनी केला.

ICC Cricket World Cup मध्ये भारतीय संघ अपराजित संघ आहे. भारताचे सेमीफायनलमधील स्थान जवळपास निश्वित आहे. भारताचे श्रीलंका, बांगलादेश आणि इंग्लंड यांच्याविरोधात सामने होणार आहेत. याउलट पाकिस्तानचा संघ सध्या विश्वचषक स्पर्धेत ‘करो या मरो’ स्थितीत आहे. पण भारताने पराभव केल्यानंतर मात्र पाकने चांगला कमबॅक केला. त्यांनी दक्षिण आफ्रिकेला पराभूत केले. पाठोपाठ अपराजित असलेल्या न्यूझीलंडविरोधातही त्यांनी विजय मिळवला. त्यामुळे त्यांनी त्यांच्या स्पर्धत आशा अजूनही जिवंत ठेवल्या आहेत.

मराठीतील सर्व क्रिकेट वर्ल्ड कप 2019 बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Icc cricket world cup 2019 team india pakistan sri lanka bangladesh semi final vjb
First published on: 27-06-2019 at 20:22 IST