scorecardresearch

ICC New Rule: आयसीसीने घेतला मोठा निर्णय! आता गोलंदाजांसाठीही टाईम आऊट; टी-२० मध्ये स्टॉप क्लॉकचा नवा नियम

ICC New Rule: आयसीसीने स्पष्ट केले आहे की, एक षटक संपल्यानंतर दुसरे षटक सुरू होण्यास एक मिनिटापेक्षा जास्त वेळ लागला आणि असे जर तीन वेळा झाले तर गोलंदाजी करणाऱ्या संघाला दंड आकारला जाईल.

ICC Now rule to use stop clock in men's ODI and T20 Internationals
आयसीसीने २०२३च्या एकदिवसीय विश्वचषकानंतर क्रिकेटचे नियम बदलले आहेत. सौजन्य- (ट्वीटर)

ICC New Rule: आयसीसीने २०२३च्या एकदिवसीय विश्वचषकानंतर क्रिकेटचे नियम बदलले आहेत. खेळाचा वेग वाढवण्यासाठी हा बदल करण्यात आला आहे. आयसीसीने गोलंदाजांसाठीही टाईम आऊटसारखे नियम केले आहेत. क्रिकेटची प्रशासकीय संस्था आयसीसीने मंगळवारी सांगितले की, जर गोलंदाजाने डावात तिसऱ्यांदा नवीन षटक सुरू करण्यासाठी ६० सेकंदांपेक्षा जास्त वेळ घेतला तर गोलंदाजी करणाऱ्या संघावर पाच धावांचा दंड आकारला जाईल. हा नियम सध्या पुरुष क्रिकेटमध्ये वन डे आणि टी-२० फॉरमॅटमध्ये लागू असेल.

सुरुवातीला हा नियम चाचणीसाठी लागू करण्यात येणार असून त्याची उपयुक्तता आणि परिणाम लक्षात घेऊन तो कायमस्वरूपी लागू करण्यात येईल. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या बोर्डाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ते म्हणाले, “सीईसी ने डिसेंबर २०२३ ते एप्रिल २०२४ या कालावधीत पुरुषांच्या एकदिवसीय आणि टी२० क्रिकेटमध्ये चाचणी आधारावर स्टॉप क्लॉक लागू करण्यास सहमती दर्शवली. षटकांमधील वेळ कमी करण्यासाठी घड्याळाचा वापर केला जाईल. मागील षटक पूर्ण झाल्यानंतर ६० सेकंदांच्या आत गोलंदाजी करणारा संघ पुढील षटक टाकण्यास तयार नसेल आणि हे जर डावात तिसऱ्यांदा घडले तर पाच धावांचा दंड आकारला जाईल,” असे आयसीसीने एका निवेदनात म्हटले आहे.

India vs Australia Cricket Score Updates in Marathi
IND vs AUS, World Cup 2023: भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यात गोंधळ घालणारा ‘जार्व्हो ६९’ आहे तरी कोण? जाणून घ्या
PAK vs NED Match Updates
PAK vs NED: बेस डे लीडने षटकार मारल्यानंतर हारिस रौफला डिवचण्यासाठी केलं असं काही की…VIDEO होतोय व्हायरल
IND vs AUS 2nd ODI Match Updates
IND vs AUS 2nd ODI: टीम इंडियाच्या फलंदाजांनी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा वाजवला बँड, विजयासाठी दिले ४०० धावांचे लक्ष्य
A stunning comeback Shreyas Iyer's amazing catch by Shaun Abbott and the umpire gives not out Watch the video
IND vs AUS 2nd ODI: जबरदस्त पुनरागमन! श्रेयस अय्यरचा शॉन अ‍ॅबॉटने पकडला अप्रतिम झेल अन् अंपायरने दिले नॉटआऊट; पाहा Video

हेही वाचा: IND vs AUS: भारतात झालेल्या विश्वचषकाने रचला इतिहास!आयसीसीची सर्वाधिक पाहिली जाणारी ठरली स्पर्धा, २०१५चा मोडला विक्रम

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळपट्टीवर बंधने घालण्याची पद्धतही आयसीसीने बदलली आहे. आयसीसीने पुढे सांगितले की, “खेळपट्टी आणि आऊटफिल्ड मॉनिटरिंगच्या नियमांमध्येही बदलांना मंजुरी देण्यात आली आहे, ज्यामध्ये खेळपट्ट्यांचे मूल्यांकन कोणत्या आधारावर केले जाते हे निकष सोपे करण्यात आले आहेत. पूर्वीचा नियम होता की, जर पाच वर्षाच्या आत त्या मैदानातील खेळपट्टीला पाच डिमेरिट पॉइंट दिले तर त्यावर बंदी घातली जात होती. आता त्याची मर्यादा सहा डिमेरिट पॉईंट्स करण्यात आली आहे. आता कोणत्याही मैदानाच्या खेळपट्टीला पाच वर्षात सहा डिमेरिट पॉईंट दिले तर त्यावर बंदी घालण्यात आली आहे.”

टाईम आउट नियम काय आहे?

आयसीसी नियम ४०.१.१ नुसार, फलंदाज बाद झाल्यानंतर किंवा निवृत्त झाल्यानंतर पुढील दोन मिनिटांत पुढील फलंदाजाने चेंडू खेळण्यासाठी तयार असणे आवश्यक आहे. जर ते तसे झाले नाही तर ते कालबाह्यतेच्या कक्षेत येते. मेरीलेबोन क्रिकेट क्लब (MCC)च्या नियमांनुसार टाईम आउटची वेळ मर्यादा जरी तीन मिनिटे असली तरी, वर्ल्ड कपमधील आयसीसी नियमांनुसार ती दोन मिनिटे आहे. कालबाह्य झालेली विकेट कोणत्याही गोलंदाजाच्या खात्यात जात नाही किंवा त्यासाठी अतिरिक्त चेंडू जोडला जात नाही.

हेही वाचा: PAK vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी उमर गुल पाकिस्तानचा वेगवान गोलंदाजी प्रशिक्षक, सईद अजमलला मिळाली ‘ही’ जबाबदारी

याच आयसीसीच्या बैठकीत बोर्डाच्या निलंबनानंतरही श्रीलंकेचा क्रिकेट संघ आंतरराष्ट्रीय सामने खेळू शकतो, असा निर्णयही घेण्यात आला. मात्र, अंडर-१९ विश्वचषक २०२४चे यजमानपद श्रीलंकेकडून काढून दक्षिण आफ्रिकेला देण्यात आले. त्याचवेळी असाही निर्णय घेण्यात आला की, जर एखादा खेळाडू पुरुष म्हणून मोठा झाला आणि पौगंडावस्थेत त्याच्या शरीरात होणारे बदल मुलांप्रमाणेच असतील, तर लिंगबदल करूनही तो महिला क्रिकेटमध्ये खेळण्यास पात्र होऊ शकत नाही.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Icc now rule like time out for bowlers also delay in starting new over will result in penalty avw

First published on: 21-11-2023 at 20:00 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×