ICC ODI World Cup 2023: क्रिकेटचा महाकुंभमेळा म्हटला जाणारा एकदिवसीय विश्वचषक सुरू व्हायला फक्त चार महिने बाकी आहेत. ही स्पर्धा यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात आयोजित केली जाणार असून त्याचे यजमानपद बीसीसीआय भूषवणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) लवकरच विश्वचषकाचे पूर्ण वेळापत्रक जाहीर करणार आहे. मात्र त्याआधीच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला (पीसीबी) मोठा झटका बसला आहे. पीसीबीने आयसीसी आणि बीसीसीआयकडे मागणी केली होती ती मागणी त्यांनी फेटाळून लावली आहे.

पीसीबीला त्यांच्या दोन सामन्यांची ठिकाणे बदलायची आहेत

वास्तविक, पाकिस्तानने आयसीसी आणि बीसीसीआयकडे मागणी केली होती. त्यांनी ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यांचे ठिकाण बदलण्याचे आवाहन केले होते. पाकिस्तानला ऑस्ट्रेलियाविरुद्ध बंगळुरूमध्ये सामना खेळायचा आहे. त्यानंतर लगेचच अफगाणिस्तानविरुद्धचा सामना चेन्नईत होणार आहे. वृत्तानुसार, पाकिस्तानी बोर्डाने दोन्ही स्थळांची अदलाबदल करण्याची मागणी केली होती.

Hardik Pandya Slapped With Fine Of 12 Lakh rupees By BCCI
मुंबई इंडियन्सचा विजय सेलिब्रेट करताना हार्दिक पंड्याला धक्का; ‘या’ साठी बीसीसीआयने ठोठावला १२ लाखांचा दंड
not to share any photo or video of the stadium on their accounts on the day of the match.
IPL 2024 : मीडिया हक्कांबाबत बीसीसीआयची कठोर भूमिका, संघ-खेळाडू आणि समालोचकांना दिल्या ‘या’ विशेष सूचना
Wakad Police Arrest 10 for IPL Betting Extortion through Betting
पिंपरी : आयपीएल क्रिकेट सामन्यावर बेटिंग; दहा जण अटकेत
IPL 2024 KKR vs RR and GT vs DC Games rescheduled
IPL 2024: आयपीएलच्या वेळापत्रकात दोन बदल, कोणत्या सामन्यांच्या तारखेत अदलाबदली; जाणून घ्या

क्रिकबझच्या म्हणण्यानुसार, आयसीसी आणि बीसीसीआयने पीसीबीच्या या मागणीला केराची टोपली दाखवली आहे. ICC आणि BCCI यांची मंगळवारी (२० जून) बैठक झाली. त्यानंतरच त्यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डालाही आपल्या निर्णयाची अधिकृत माहिती दिली आहे.

विश्वचषकाचा पहिला सामना ५ ऑक्टोबरला होणार आहे

यावेळच्या विश्वचषकाची सुरुवात ५ ऑक्टोबरला अहमदाबादमध्ये गतविजेता इंग्लंड आणि गेल्या वर्षीचा उपविजेता न्यूझीलंड यांच्यातील सामन्याने होणार आहे. त्याच वेळी, भारतीय संघ आपला पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध ८ ऑक्टोबर रोजी चेन्नईमध्ये खेळणार आहे. पाकिस्तान संघ ६ ऑक्टोबर रोजी हैदराबादमध्ये क्वालिफायर संघाविरुद्ध पहिला सामना खेळेल.

हेही वाचा: MS Dhoni: “आम्हा सर्वांना त्याच्यातील हे कौशल्य…” एम.एस. धोनी कर्णधार कसा झाला? याबाबत दिलीप वेंगसरकरांनी केला खुलासा

कोणत्या परिस्थितीत ठिकाण बदलता येईल?

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला ही दोन्ही ठिकाणे का बदलायची आहेत? याचे उत्तर त्यांनी दिलेले नाही. अशा परिस्थितीत आयसीसी आणि बीसीसीआयने त्यांची विनंती फेटाळून लावली आहे. ते म्हणाले की, “स्पर्धा अगदी जवळ आली आहे, अशा परिस्थितीत स्थळ बदलता येणार नाही. जरी असं असलं तरी, स्थळ बदलण्याचा अधिकार भारताला आहे, पण त्यासाठीही आयसीसीची परवानगी घ्यावी लागेल.”

माहितीसाठी की, जेव्हा खेळाडूंच्या सुरक्षेशी संबंधित समस्या असेल तेव्हाच विश्वचषकात ठिकाणे बदलली जाऊ शकतात पण इथे असं काही नाही. तसेच, दुसऱ्या स्थितीत, जेव्हा ते मैदान आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी योग्य मानले जात नाही तेव्हा स्थळ बदलले जाऊ शकते. अशा परिस्थितीत येथे दोन्ही परिस्थिती निर्माण होत नसेल तर स्थळ बदलणे शक्य होणार नाही.

हेही वाचा: ENG vs AUS: संजय मांजरेकरांच्या मते ‘ही’ आहे इंग्लंडसाठी चिंतेची बाब; ते म्हणाले की, “स्टोक्ससाठी चांगली चिन्हे नाहीत…”

भारत-पाकिस्तान सामन्याचे ठिकाण यापूर्वीही बदलण्यात आले होते

पाकिस्तानला टीम इंडियाविरुद्ध अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सामना खेळायचा आहे. अशा परिस्थितीत पीसीबीने सुरक्षेचे कारण देत हे ठिकाण बदलण्याची मागणी केली होती, परंतु आयसीसी आणि बीसीसीआयने या मागणीकडेही लक्ष दिले नाही. यापूर्वीही अनेक वेळा स्थळे बदलण्यात आली आहेत. २०१६च्या टी२० विश्वचषकादरम्यान, भारत-पाकिस्तान सामना सुरक्षेच्या कारणास्तव धर्मशाला येथून कोलकाता येथे हलवण्यात आला होता.