Dilip Vengsarkar reveals MS Dhoni Captaincy: १४ सप्टेंबर २००७ रोजी राहुल द्रविडने भारताचे सर्व स्वरूपाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला तेव्हा एम.एस. धोनी टी२० विश्वचषक स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याच्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तानविरुद्ध भारताचे नेतृत्व करत होता. भारताचा कर्णधार म्हणून धोनीचा हा पहिलाच सामना होता. आता भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एम.एस. धोनी हा आता आपल्या कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्यात आहे. चार वर्षांपूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर, सध्या तो केवळ आयपीएल खेळताना दिसतो.

माहीच्या नेतृत्वात भारतीय संघाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप वगळता आयसीसीच्या सर्व स्पर्धा आपल्या नावे केल्या होत्या. एम.एस. धोनीला प्रथम भारतीय संघाचे कर्णधार म्हणून नियुक्त करणारे निवड समितीचे माजी अध्यक्ष दिलीप वेंगसरकर यांनी आता धोनीला कोणत्या परिस्थितीत टीम इंडियाचा कर्णधार बनवले याबाबत खुलासा केला आहे.

Former Governor D Subbarao
आरबीआयचे माजी गव्हर्नर डी सुब्बाराव यांनी केंद्र सरकारला दिला ‘हा’ सल्ला; म्हणाले, “श्वेतपत्रिका…”
Dindori lok sabha election 2024, Communist Party of India (Marxist), jiva pandu gavit
दिंडोरीत कार्यकर्त्यांच्या दबावामुळे माकप उमेदवार उभा करणार
sheikh hasina
“आधी तुमच्या बायकांच्या साड्या जाळून टाका”, Boycott India मोहिमेवर बांगलादेशच्या पंतप्रधानांचे विरोधकांना आव्हान!
reaction of krupal tumane, MP, eknath shinde, ramtek lok sabha constituency, lok sabha election 2024
उमेदवारी नाकारल्यानंतर शिंदे गटाच्या खासदाराची पहिली प्रतिक्रिया,म्हणाले “हो मी दुःखी, पण….”

टीम इंडियाचा कर्णधार म्हणून धोनीचा हा पहिलाच सामना होता पण स्कॉटलंडविरुद्धच्या सलामीचा सामना एकही चेंडू न टाकता पावसामुळे वाया गेला. २००७ साली द्रविडच्या नेतृत्वात काही महिन्यांपूर्वी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत गट-स्टेजमधून बाहेर पडल्यानंतर आणि त्यानंतर इंग्लंडकडून एकदिवसीय मालिकेत ३-४ असा पराभव झाल्यानंतर त्याने कर्णधारपदाचा राजीनामा दिला. विश्वचषकाच्या टी२० प्रकारातून त्याने स्वतःला बाजूला केल्यानंतर निवड समितीने धोनीचे नाव पुढे केले.

हेही वाचा: Ashes 2023: ऑस्ट्रेलियाच्या विजयानंतर ऑली रॉबिन्सनने कमिन्सला डिवचले; म्हणाला, “नेहमीच ११व्या क्रमांकाचा फलंदाज…”

द्रविडच्या नेतृत्त्वात मात्र, संघ कसोटीत चांगली कामगिरी करत होता. त्यांनी इंग्लंडविरुद्ध १-० ने मालिका विजय नोंदवला होता. वेस्ट इंडिजमधील विश्वचषकात संघाच्या निराशाजनक प्रदर्शनानंतर भारतीय संघाचा कर्णधार म्हणून द्रविडचे दिवस संपले होते. नेतृत्वाचा कोणताही अनुभव नसताना धोनीला २००७ टी२० विश्वचषकात भारतीय संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त केले गेले होते. या विश्वचषकातून सर्व वरिष्ठ खेळाडूंनी माघार घेतल्यानंतर माहीकडे जबाबदारी आलेली.

एम.एस. धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघाने ऐतिहासिक कामगिरी करत हा विश्वचषक जिंकला. त्यावेळी घडलेल्या घडामोडींविषयी बोलताना निवड समितीचे माजी अध्यक्ष वेंगसरकर म्हणाले, “धोनीकडे बघून आम्हाला नेहमीच त्याच्यातील संघाचे नेतृत्व करू शकतो असा एक विश्वास वाटायचा. मैदानावरील त्याचा वावर कसा आहे, तो संघातील इतर खेळाडूंची कसा बोलतो, पुढे होऊन जबाबदारी घेण्याची त्याची क्षमता, वरिष्ठांनासोबत सर्वांना घेऊन जाण्याची त्याची क्षमता व खेळाची समज या सर्व गोष्टी माहीच्या बाजूने होत्या.”

हेही वाचा: Ashes 2023: शानदार विजयानंतरही कांगारुंचे नाक कापले; ‘या’ कारणास्तव ICCने ठोठावला ऑस्ट्रेलिया-इंग्लंडला दंड, WTCतही झाले नुकसान

पुढे बोलताना वेंगसरकर म्हणाले की, “विश्वचषकाच्या आधी सचिन तेंडुलकरने आम्हाला ज्यावेळी कर्णधार म्हणून धोनीचे नाव सुचवले तेव्हा, कोणालाच त्याच्या नावाला विरोध करता आला नाही. कारण, सचिनला त्याच्यात दूरदृष्टी दिसत होती आणि त्याचे म्हणणे खरे ठरले.”