भारतीय टी-२० संघांमध्ये पुढील दोन वर्षांत मोठे बदल होणार असल्याची माहिती समोर आली आहे. पुढील दोन वर्षांमध्येच रोहित शर्मा, विराट कोहली आणि रविचंद्रन अश्विन यासारख्या खेळाडूंना टी-२० संघामधून वगळण्यात येणार असल्याचे संकेत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या सूत्रांनी पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना दिले आहेत. रविचंद्रन अश्विन आणि दिनेश कार्तिक यांना पुन्हा क्रिकेटमधील या सर्वात छोट्या प्रकारामध्ये संधी मिळण्याची शक्यता फारच आहे. याशिवाय विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनीच टी-२० मधील त्यांच्या भविष्यातील वाटचालीबद्दल योग्य तो निर्णय घ्यावा अशी बीसीसीआयची इच्छा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नक्की वाचा >> भारत वर्ल्ड कपमधून बाहेर: कोहलीच्या बहिणीची Instagram Story चर्चेत; म्हणाली, “आपण अशावेळी संघाला…”, भावासाठीही खास मेसेज

विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीमधील सामन्यात इंग्लंडकडून लाजिरवाणा पराभव झाल्यानंतर रोहित शर्मा निराश झाल्याची आणि डोळे पुसत असल्याची दृश्य कॅमेरात कैद झाली. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने त्याला धीर देण्याचं काम केलं. सामना संपल्यानंतरही राहुल द्रवीडनेच पत्रकार परिषद घेतली.

नक्की वाचा >> Ind vs Eng: “केएल राहुल म्हणजे सर्वात मोठा Fraud, महत्त्वाच्या सामन्यांमध्ये धावा काढत नाही आणि संघाला…”

पुढील विश्वचषक स्पर्धा दोन वर्षांनी आहे. मात्र सध्या बीसीसीआयकडून ज्या पद्धतीची तयारी सुरु आहे ती पाहता या विश्वचषक स्पर्धेमध्ये नवा भारतीय संघ मैदानात उतरवला जाईल. विशेष म्हणजे हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली हा संघ खेळेल अशी दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. हार्दिककडे या सर्वात छोट्या फॉरमॅटमधील नेतृत्व दिर्घकाळासाठी असेल अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे.

नक्की वाचा >> World Cup: भारताच्या पराभवानंतर पाकिस्तानी पत्रकाराने मर्यादा सोडली; मोदींचा Video शेअर करत म्हणाला, “पंतप्रधानांनी…”

“बीसीसीआयने कधीच कोणाला निवृत्त होण्यास सांगितलं नाही. निवृत्तीचा निर्णय हा पूर्णपणे वैयक्तिक असतो. मात्र २०२३ मध्ये टी-२० चे मोजकेच सामने भारतीय संघ खेळणार आहे. त्यामुळे यापुढे अनुभवी खेळाडूंचा विचार एकदिवसीय सामने आणि कसोटी सामन्यांसाठी केला जाईल,” असं बीसीसीआयच्या सूत्रांनी पीटीआयशी बोलताना सांगितलं. नाव न जाहीर करण्याच्या अटीवर ही माहिती बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी दिली. “इच्छा नसेल तर खेळाडूंनी निवृत्ती जाहीर करण्याची गरज नाही. मात्र पुढील वर्षी तुम्ही त्यांना नक्कीच टी-२० सामने खेळताना पाहणार नाही,” असं या अधिकाऱ्याने स्पष्ट केलं.

नक्की वाचा >> World Cup: भारत स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर शाहीद आफ्रिदी म्हणाला, “भारताकडे कोणतंही…”; अंतिम सामन्याचा केला उल्लेख

एकीकडे बीसीसीआयने नव्या संघासंदर्भातील तयारी सुरु केली असतानाच दुसरीकडे राहुल द्रवीडने सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेमध्ये विराट आणि रोहित सारख्या वरिष्ठ खेळाडूंच्या भवितव्याबद्दल अत्ताच भाष्य करणं घाईचं ठरेल असं म्हटलं आहे. “त्यांच्याबद्दल या उपांत्य फेरीनंतर बोलणं हे फार घाईचं ठरेल. मात्र हे खेळाडू सध्या सर्वोत्तम कामगिरी करणारे खेळाडू आहेत. पुढील काही वर्ष आमच्या हाती आहेत यासंदर्भातील निर्णय घेण्यासाठी,” असं द्रवीड म्हणाला.

नक्की वाचा >> Ind vs Eng: भारताचा दारुण पराभव! स्कोअरकार्ड पोस्ट करत शोएब अख्तर म्हणाला, “बिनबाद १७०… हा आकडा पुढील बराच काळ…”

भारतीय संघाचं वेळापत्रक पाहिल्यास आता भारत केवळ बायलिटरल म्हणजेच दोन संघांचाच समावेश असणाऱ्या टी-२० मालिका खेळणार आहे. पुढील आठवड्यात न्यूझीलंडविरुद्ध टी-२० मालिकेस सुरुवात होणार आहे. या मालिकेमध्ये रोहित, कोहलीला विश्रांती देण्यात आली असून शुभमन गीलचा समावेश करण्यात आला आहे. उपकर्णधार असलेला ऋषभ पंत सुद्धा एक उत्तम सलामीवीर असल्याने तो या मालिकेत नव्या भूमिकेत दिसू शकतो. पृथ्वी शॉ सारख्या खेळाडूंवरही बीसीसीआयची नजर असल्याचं सांगितलं जात आहे.

नक्की वाचा >> Ind vs Eng: २८ चेंडूंमध्ये २७ धावा! ‘टी-२० मध्ये कसोटी खेळणाऱ्या रोहितचं अभिनंदन’; ‘हिटमॅन’च टार्गेटवर, चाहत्यांना संताप अनावर

रोहित आणि विराट कोलही हे बीसीसीआयच्या दृष्टीनेही फार महत्त्वाचे आणि नावलौकिक मिळवलेले खेळाडू आहेत. त्यामुळे त्यांना बाजूला होण्यास सांगण्याची वेळ येऊ नये अशी बीसीसीआयची इच्छा असून हे खेळाडूच योग्य वेळी निर्णय घेतील असं बीसीसीआयला वाटतं. रोहित सध्या ३५ वर्षांचा असून दोन वर्षांनंतर म्हणजेच वयाच्या ३७ व्या वर्षी तो टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारताचं नेतृत्व करणार नाही असं सांगितलं जात आहे.

मराठीतील सर्व T20 World Cup बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Many seniors players including rohit sharma virat kohli will not play t20 format next year transition will kick off bcci source scsg
First published on: 11-11-2022 at 09:42 IST