सिडनी वन-डे सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर 34 धावांनी मात वन-डे मालिकेची मोठ्या धडाक्यात सुरुवात केली. कांगारुंनी भारताला विजयासाठी दिलेलं 289 धावांचं आव्हान भारताला पेलवलं नाही. झाय रिचर्डसन आणि जेसन बेहरनडॉर्फच्या माऱ्यासमोर भारताचा संघ पुरता कोलमडला. धोनीने संथ खेळी करत 51 धावा जमवल्या. मात्र बेहरनडॉर्फच्या गोलंदाजीवर धोनीला चुकीच्या पद्धतीने पायचीत ठरवण्यात आलं. धोनीची विकेट आम्हाला मिळाली हे आमचं भाग्यच होतं अशी प्रतिक्रीया रिचर्डसनने सामना संपल्यानंतर बोलताना व्यक्त केली.

अवश्य वाचा – Video : जेव्हा DRS ची संधी गमावणं भारताला महागात पडतं, धोनीला पंचांनी चुकीच्या पद्धतीने ठरवलं बाद

“पहिल्या 3 विकेट गेल्यानंतर रोहित आणि धोनीने चांगली भागीदारी रचली होती. ही भागीदारी अशीच सुरु राहिली असती तर सामना आमच्या हातातून निसटली असता. मात्र धोनीची विकेट आम्हाला मिळाली हे आमचं भाग्यच होतं.” रिचर्सडसन सामना संपल्यानंतर पत्रकारांशी बोलत होता. रिचर्डसनने 4 भारतीय फलंदाजांना बाद केलं. यावेळी बोलत असताना रिचर्डसनने रोहितच्या खेळाचंही कौतुक केलं.

अवश्य वाचा – हार्दिक-लोकेश राहुलच्या जागी शुभमन गिल-विजय शंकरची संघात निवड

रोहितने भारताकडून सामन्यात चांगली फलंदाजी केली. ज्या संयमी पद्धतीने तो फलंदाजी करत होता, ते पाहता तो भारताला नक्कीच सामना जिंकवून देऊ शकला असता. त्यामुळे एका क्षणानंतर रोहितला स्ट्राईकवर येऊ द्यायचं नाही असं आम्ही ठरवलं होतं. ही रणनिती कामी आली आणि यानंतर धोनी बाद झाल्यानंतर सामना आमच्या बाजूने फिरला. रिचर्डसनला या कामगिरीसाठी सामनावीराचा किताबही देण्यात आला.

अवश्य वाचा – IND vs AUS : एक धाव आणि धोनी मानाच्या पंक्तीत, वन-डे क्रिकेटमध्ये १० हजार धावांचा टप्पा पूर्ण