बीसीसीआयकडून निलंबनाची कारवाई भोगत असलेल्या हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुल यांच्या जागी निवड समितीने विजय शंकर आणि युवा शुभमन गिलची भारतीय संघात निवड केली आहे. ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमात हार्दिक पांड्याने महिलांविषयी आक्षेपार्ह विधानं केली होती, ज्यामुळे बीसीसीआयने दोन्ही खेळाडूंवर कारवाई करुन त्यांना ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून मायदेशी बोलावून घेतलं. या दोन्ही खेळाडूंच्या जागी गिल आणि विजय शंकरची संघात निवड करण्यात आलेली आहे.

अवश्य वाचा – IND vs AUS : सिडनी वन-डे सामन्यात नोंदवलेले हे ९ विक्रम तुम्हाला माहिती आहेत का?

15 जानेवारी रोजी होणाऱ्या दुसऱ्या वन-डे सामन्याआधी विजय शंकर ऑस्ट्रेलियात दाखल होणार आहे. तर शुभमन गिल हा न्यूझीलंड दौऱ्याआधी भारतीय संघासोबत जोडला जाईल. भारतीय संघात निवड होण्याची शुभमन गिलची ही पहिलीच वेळ ठरली आहे. यंदाच्या प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये शुभमन गिलने धडाकेबाज कामगिरी केली आहे. केवळ 9 सामन्यांमध्ये गिलने 1 हजार धावा केल्या आहेत.

अवश्य वाचा – दुष्काळात तेरावा महिना ! बंदीच्या शिक्षेनंतर कंपन्यांचीही हार्दिक-राहुलकडे पाठ