India vs England 1st Test: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय फलंदाजांचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. भारतीय संघाकडून पहिल्या डावात फलंदाजी करताना ३ फलंदाजांनी शतकं झळकावली. भारतीय संघाने पहिल्या डावात ४७१ धावांचा डोंगर उभारला. भारतीय संघाकडून सलामीवीर यशस्वी जैस्वाल, कर्णधार शुबमन गिल आणि उपकर्णधार ऋषभ पंतने दमदार शतकी खेळी केली. मात्र ८ वर्षांनंतर भारतीय कसोटी संघात कमबॅक करत असलेला करूण नायर शून्यावर माघारी परतला आहे.

भारतीय संघाकडून फलंदाजी करताना दुसऱ्या दिवशी ऋषभ पंतने आपलं शतक पूर्ण केलं. यासह ऋषभने शुबमन गिलसोबत मिळून २०० धावांची भागीदारी केली. त्यानंतर गिल १४७ धावांची खेळी करून माघारी परतला. गिल बाहेर जाताच करूण नायर मैदानात आला. तब्बल ३००६ दिवस संघाबाहेर राहिलेला करूण नायर पहिल्यांदाच भारतीय संघाकडून खेळण्यासाठी मैदानात उतरणार होता. मात्र, त्याचा पहिला डाव अवघ्या ४ चेंडूत आटोपला. बेन स्टोक्सने टाकलेल्या चेंडूवर करूणने कव्हर ड्राईव्ह मारण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा प्रयत्न फसला. कव्हर्सला क्षेत्ररक्षण करत असलेल्या ओली पोपने हवेत डाईव्ह मारत भन्नाट झेल घेतला. या झेलचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

करूण नायरसाठी हा सामना अतिशय महत्वाचा आहे. कारण बरेच वर्ष वाट पाहिल्यानंतर त्याला भारतीय संघात आपलं हक्काचं स्थान मिळालं आहे. भारतीय संघात स्थान मिळत नसल्यामुळे त्याने सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्याने लिहिले होते की, प्रिय क्रिकेट, प्लिझ मला एकदा संधी दे. आता क्रिकेटने त्याला संधी दिली आहे. पहिल्या डावात तो शून्यावर माघारी परतला. दुसऱ्या डावात तो कमबॅक करणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

भारतीय संघाने उभारला ३७१ धावांचा डोंगर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर इंग्लंडने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाकडून यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुलने ९१ धावांची भागीदारी करत दमदार सुरूवात करून दिली. भारतीय संघाकडून यशस्वी जैस्वालने १०१ धावांची तर केएल राहुलने ४२ धावांची खेळी केली. त्यानंतर शुबमन गिलने १४७ आणि ऋषभ पंतने १३३ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर भारतीय संघाने ४७१ धावांचा डोंगर उभारला.