Asian Games 2023, IND vs PAK Hockey: हांगझाऊ आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुष हॉकीमध्ये भारताने पाकिस्तानचा १०-२ असा पराभव केला आहे. हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने सलग चौथा विजय मिळवला. यासह भारत उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला आहे. आता अ गटातील अंतिम सामन्यात भारत बांगलादेशशी भिडणार आहे. टीम इंडियासाठी कर्णधार हरमनप्रीत सिंगने चार, तर वरुणने दोन गोल केले. ललित, समशेर, मनदीप आणि सुमित यांनी प्रत्येकी एक गोल केला. भारत-पाकिस्तान हॉकी सामन्यात कोणत्याही संघाने १० गोल करण्याची ही पहिलीच वेळ आहे. भारताने हा नवीन विक्रम करत इतिहास नोंदवला आहे.

भारताने पहिल्या क्वार्टरमध्ये दोन गोल केले

पहिल्या क्वार्टरमध्ये आठव्या मिनिटालाच भारताने पहिला गोल केला. मनदीप सिंगने मैदानी गोल करत टीम इंडियाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर ११व्या मिनिटाला पाकिस्तानी गोलकीपरच्या फाऊलमुळे भारताला पेनल्टी स्ट्रोक मिळाला. यावर कर्णधार हरमनप्रीत सिंगने गोल करत भारतीय संघाला २-० ने आघाडीवर नेले. भारतीय संघाने पहिल्या क्वार्टरमध्ये २-० अशी आघाडी घेतली होती.

PAK vs BAN Test Ahmad Shahzad mocking on Pakistan team
PAK vs BAN Test Series : लाजिरवाण्या पराभवानंतर अहमद शहजादने पाकिस्तानची उडवली खिल्ली; म्हणाला, ‘बांगलादेशने तुम्हाला तुमच्याच…’
how does suiceide pod work
इच्छामरणासाठी तयार करण्यात आलेले ‘सुसाईड पॉड’ काय आहेत? हे मशीन कसे कार्य करते? याची चर्चा का होत आहे?
Najmul Shanto on Team India
Najmul Shanto : बांगलादेशच्या कर्णधाराचे ऐतिहासिक विजयानंतर मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘भारताविरुद्ध पण आम्ही…’
Basit Ali Gives Suggestion to PCB Said Just Copy What India Is Doing
PAK vs BAN: “भारतीय संघाला कॉपी करा…” पाकिस्तानच्या माजी खेळाडूचा PCB ला सल्ला; म्हणाला, “पाकिस्तान क्रिकेट यशस्वी होण्यासाठी भारत…”
World Test Championship 2025 How Pakistan Qualify for Final Match
PAK vs BAN: बांगलादेशकडून पराभूत झाल्यानंतरही पाकिस्तान WTC फायनलमध्ये पोहोचू शकतो? काय आहे समीकरण?
PAK vs BAN Mohammed Rizwan Broke Rishabh Pant and Andy Flower Record
PAK vs BAN: मोहम्मद रिझवानने मोडला ऋषभ पंतचा विक्रम, पराभूत कसोटी सामन्यात ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला पाकिस्तानी यष्टिरक्षक
Pakistani team cricketers trolls on social media
PAK vs BAN : बांगलादेशविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तानचा संघ तुफान ट्रोल, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
Pakistan drop in the World Test Championship table after defeat against Bangladesh
PAK vs BAN : पाकिस्तानची बांगलादेशविरुद्धच्या लाजिरवाण्या पराभवानंतर क्रिकेट विश्वात फजिती! डब्ल्यूटीसी गुणतालिकेतही घसरण

दुसऱ्या क्वार्टरमध्ये भारताने ४-० अशी आघाडी घेतली

दुसऱ्या क्वार्टरच्या १७व्या मिनिटाला भारतीय कर्णधार हरमनप्रीत सिंगने पेनल्टी कॉर्नरवर ड्रॅग फ्लिकसह अप्रतिम गोल केला आणि टीम इंडियाची आघाडी ३-० अशी वाढवली. यानंतर ३०व्या मिनिटाला म्हणजेच दुसऱ्या क्वार्टरच्या शेवटच्या क्षणी सुमित, ललित आणि गुरजंत यांच्या जोडीने भारताने चौथा गोल केला. मध्यंतरापर्यंत भारताने पाकिस्तानवर ४-० अशी आघाडी घेतली होती.

तिसऱ्या क्वार्टरमध्ये पाकिस्तानने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला

तिसऱ्या क्वार्टरच्या ३३व्या मिनिटाला पाकिस्तानने केलेल्या फाऊलवर भारताला आणखी एक पेनल्टी स्ट्रोक मिळाला. यावर कर्णधार हरमनप्रीतने गोलची हॅट्ट्रिक पूर्ण केली. यानंतर ३४व्या मिनिटाला हरमनप्रीतने पेनल्टी कॉर्नरवर ड्रॅग फ्लिकसह चौकार लगावला. ३८व्या मिनिटाला पाकिस्तानच्या सुफियान मोहम्मदने पेनल्टी कॉर्नरवर ड्रॅग फ्लिकसह अप्रतिम गोल केला. या सामन्यातील पाकिस्तानचा हा पहिला गोल ठरला. यानंतर ४१व्या मिनिटाला सुखजीतच्या पासवर भारताच्या वरुण कुमारने शानदार गोल करत भारताची आघाडी ७-१ अशी वाढवली. यानंतर तिसऱ्या क्वार्टरच्या शेवटच्या क्षणी पाकिस्तानच्या अब्दुलने पेनल्टी कॉर्नरवर गोल करत पाकिस्तानला विजय मिळवून दिला. तिसऱ्या क्वार्टरमध्ये भारताने पाकिस्तानवर ७-२ अशी आघाडी घेतली होती.

हेही वाचा: World Cup 2023: अश्विनच्या डुप्लिकेटने कांगारूंच्या मनसुब्यांवर फिरवले पाणी, कोण आहे ‘हा’ खेळाडू ज्याने ऑस्ट्रेलियाबरोबर सरावास दिला नकार?

चौथ्या क्वार्टरमध्ये भारताने तीन गोल केले

चौथ्या क्वार्टरच्या ४६व्या मिनिटाला भारताच्या समशेरने अप्रतिम मैदानी गोल केला. या सामन्यातील भारताचा हा आठवा गोल ठरला. यानंतर ४९व्या मिनिटाला जर्मनप्रीत सिंगकडून ललित उपाध्यायने गोल करून भारताची आघाडी ९-२ अशी वाढवली. ५३व्या मिनिटाला वरुणने सामन्यातील आपला दुसरा आणि भारताचा १०वा गोल केला. अशा प्रकारे टीम इंडियाने पाकिस्तानचा १०-२ असा पराभव केला.

टीम इंडिया जबरदस्त फॉर्ममध्ये आहे

एशियाडमध्‍ये भारताची कामगिरी उत्‍कृष्‍ट राहिली असून, पूल-अ मध्‍ये आतापर्यंत चारही सामने जिंकले आहेत. त्याचवेळी, पाकिस्तान संघाने भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी अ गटातील तिन्ही सामने जिंकले होते. भारतीय संघ जबरदस्त फॉर्मात आहे. त्यांनी त्यांच्या पूल-ए सामन्यात उझबेकिस्तानचा १६-० असा पराभव केला होता. यानंतर हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील संघाने सिंगापूरचा १६-१ असा पराभव करत सलग दुसरा विजय संपादन केला. त्यानंतर टीम इंडियाने २०१८ आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या जपानचा ४-२ असा पराभव करून विजयाची हॅट्ट्रिक साधली. आता भारताने पाकिस्तानला हरवून विजय संपादन केला आहे. त्याचवेळी, पूल ए च्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानने सिंगापूरचा ११-०, बांगलादेशचा ५-२ आणि उझबेकिस्तानचा १८-२ असा पराभव केला होता. भारताविरुद्ध १०-२ असा पराभव पत्करावा लागला.

हेही वाचा: Asian Games 2023: मीराबाई चानूला झाली गंभीर दुखापत, प्रशिक्षकांनी उचलून बाहेर नेले, पदक हुकल्याने हाती निराशा

भारत-पाकिस्तान आमनेसामने विक्रम

या एशियाड सामन्यापूर्वी, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शेवटचा सामना यावर्षी ऑगस्टमध्ये आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पूल सामन्यादरम्यान झाला होता. भारतीय संघाने हा सामना ४-० असा जिंकला होता. २०१३ पासून भारत आणि पाकिस्तान यांच्यात २५ सामने खेळले गेले आहेत. टीम इंडियाने या कालावधीत १७ सामने जिंकले आहेत, तर पाकिस्तानने पाच सामने जिंकले आहेत. तीन सामने अनिर्णित राहिले. दोन्ही देशांदरम्यान एकूण १८० सामने खेळले गेले आहेत. यापैकी टीम इंडियाने ६६ सामने जिंकले आहेत, तर पाकिस्तानने ८२ सामने जिंकले आहेत. ३२ सामने अनिर्णित राहिले.